नाशिक

नाशिक : महापालिकेत परसेवेतील अधिकाऱ्यांच्या ‘एण्ट्रीला ब्रेक’

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर व अधीक्षक अभियंता या दोन पदांवर परसेवेतील अधिकारी नियुक्तीच्या प्रयत्नांना अखेर 'ब्रेक' लागला आहे. महापालिका प्रशासनाने यापूर्वी जलसंपदा विभागाला पत्र पाठवत ही दोन्ही पदे रिक्त नसल्याचे कळविले होते. प्रशासनाच्या याच पत्राचा आधार घेत स्थानिक अधिकारी व अभियंत्यांनी विरोध तीव्र केल्याने अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील शहर व अधीक्षक अभियंता पदावर परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा घाट घातला जात आहे. यावरून महापालिकेत पुन्हा एकदा स्थानिक विरुध्द परसेवेतील अधिकारी असा संघर्ष उभा ठाकला आहे. महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या म्युनिसिपल कामगार-कर्मचारी सेनेने परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध दर्शविला आहे. जलसंपदा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांची महापालिकेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामध्ये अधीक्षक अभियंता या पदावर प्रतिनियुक्तीने बदली करण्याच्या एका आमदाराच्या पत्रानुसार सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी शासनाच्या नगर विकास विभागाच्या कार्यसन अधिकाऱ्यांना या संदर्भात लेखी मत कळविले होते. ऑक्टोबर २०२३ रोजी शासनाला नाशिक महापालिकेत अधीक्षक अभियंता व शहर अभियंता हे पदे रिक्त नसल्याचा स्पष्ट अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामुळे शासनाकडून प्रतिनियुक्तीने दोन्ही पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT