नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्योजकास धमकावत खंडणी मागण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेव्हणी, साडूसह त्यांच्या वडिलांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक भागीदारी आणि आर्थिक व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून या संपूर्ण प्रकार घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादी उद्योजक गोविंद गौरीशंकर झा (४९, रा. अश्विननगर, सिडको) यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. कोरोना काळात त्यांनी नातेसंबंधामुळे साडू राजीव वसंत चौधरी रा. कांदिवली, मुंबई) यांना कंपनीत संचालक म्हणून सामावून घेतले.
मात्र, कालांतराने कंपनीतील कामकाजात आणि आर्थिक बाबींमध्ये तफावत आढळल्याने झा यांनी राजीव चौधरी यांना पदावरून कमी करून त्यांचा राजीनामा घेतला. पदावरून काढल्याचा राग मनात धरून संशयित राजीव चौधरी यांनी त्यांना कायदेशीर अडचणीत आणण्याची धमकी दिली. कंपनीच्या संदर्भात जीएसटी, डीआयसी, एमआयडीसी आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या पोर्टलवर खोट्या तक्रारी करून व्यवसायात अडथळे निर्माण करण्याची भीती दाखविली.
तसेच, या तक्रारी मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यासोबतच कंपनी सेक्रेटरी यांना ईमेल पाठवून कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रा. कांदिवली, मुंबई) यांना कंपनीत संचालक म्हणून सामावून घेतले.
मात्र, कालांतराने कंपनीतील कामकाजात आणि आर्थिक बाबींमध्ये तफावत आढळल्याने झा यांनी राजीव चौधरी यांना पदावरून कमी करून त्यांचा राजीनामा घेतला. पदावरून काढल्याचा राग मनात धरून संशयित राजीव चौधरी यांनी त्यांना कायदेशीर अडचणीत आणण्याची धमकी दिली. कंपनीच्या संदर्भात जीएसटी, डीआयसी, एमआयडीसी आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या पोर्टलवर खोट्या तक्रारी करून व्यवसायात अडथळे निर्माण करण्याची भीती दाखविली.
तसेच, या तक्रारी मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यासोबतच कंपनी सेक्रेटरी यांना ईमेल पाठवून कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेसंबंधातील बेबनावातून गुन्हा
अंबड पोलिसांनी संशयित राजीव वसंत चौधरी, त्यांच्या पत्नी वंदना चौधरी आणि वडील वसंत चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा वाद प्रामुख्याने व्यावसायिक कारणातून आणि नातेसंबंधातील बेबनावातून झाल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी करत आहेत. पोलिसांनी सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून, संशयितांची बाजू जाणून घेण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.