नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी असून, बहुचर्चित द्वारका सर्कल वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता काही प्रमाणात उपाय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. द्वारका चौकातील मुंबई-आग्रा महामार्गावरील भुयारी मार्गाच्या मुख्य कामाचा टप्पा पूर्ण झाल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सोमवार (दि. 15) पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून वाहतूक वळविण्यात आल्याने निर्माण झालेला ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
काठे गल्ली ते सारडा सर्कलदरम्यान उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाच्या कामासाठी द्वारका चौकातील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी इंदिरानगर बोगदा, राणेनगर बोगदा, वडाळा नाका तसेच शहरातील इतर प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. आता मुंबईकडे आणि धुळ्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू होत असल्याने या मार्गावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, सारडा सर्कल ते काठे गल्ली सिस्रलदरम्यानच्या भुयारी मार्गाच्या उर्वरित कामालाही वेग देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले असून, काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यासाठी राज्य पायाभूत विकास महामंडळ आणि शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
कामादरम्यान वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सारडा सर्कल आणि काठे गल्ली सिग्नल परिसरात उंच बॅरिकेडिंग उभारून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुणे रोडकडून तसेच शहराच्या विविध भागांतून द्वारकाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक, कंटेनर आणि अन्य जड वाहनांना पर्यायी मागनि वळविले आहे. ज्येष्ठ नागरिक रुग्णांना दिलासा रस्ता बंद झाल्याने स्थानिक रहिवासी, हरिहर सोसायटी, नवरंग कॉम्प्लेक्स रहिवासी व व्यापारी, रुग्ण यांचे हाल झाले होते मात्र आता दिलासा मिळणार आहे.