Divya Padvi MPSC Result 2026  
नाशिक

Divya Padvi MPSC Result 2026 | नाशिकच्या लेकीची 'राज्यसेवे'त मोठी झेप; दिव्या पाडवी पहिल्याच प्रयत्नात 'क्लास वन' अधिकारी!

Divya Padvi MPSC Result 2026 | दिव्या पाडवी हिने राज्यात सातवा क्रमांक पटकावत एसटी प्रवर्गात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत नाशिकच्या दिव्या पुनाजी पाडवी (२३) हिने उल्लेखनीय यश मिळवले. दिव्या पाडवी हिने राज्यात सातवा क्रमांक पटकावत एसटी प्रवर्गात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

तिची कृषी उपसंचालक या पदावर नियुक्ती झाली आहे. दिव्या हिने आपले शिक्षण एम. एस्सी. (अॅग्री) राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून पूर्ण केले आहे. कमी वयात राज्यसेवेच्या पहिल्याच प्रयत्नात तिला वर्ग-१ पदाची संधी मिळाली. तिचे वडील पुनाजी पाडवी हे जिल्हा परिषदेच्या दिंडोरी येथे तर आई रेखा पाडवी या नाशिक मनपाच्या शाळा क्र. १६ मध्ये कार्यरत आहेत.

स्पर्धा परीक्षेसाठीची प्रेरणा आई रेखा पाडवी यांच्याकडून मिळाली. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ व राज्य परिवहन अधिकारी विजय भोये यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने पाडवी हिने आई-वडील व सर्व गुरुजनांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT