नाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने' अंतर्गत मोठी माहिती समोर आली आहे. जर तुम्ही लोकप्रतिनिधी असाल किंवा तुमचे मासिक वेतन २५ हजार रुपयांहून अकिध असेल, तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. अशा अपात्र लाभार्थ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीतून थेट राज्य शासन स्तरावरच वगळली जाणार आहेत. दरम्यान, सध्या बँकांनी केवळ दोन लाख व त्यावरील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत.
या अनुषंगाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील २३ हजार ७९८ कर्ज खात्यांचा तपशील शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.
राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली असून, नासिक शिक्षा भवती सहकारी बैंक लि, नासिक दोन लाखांपर्यंत थकबाकी संपूर्ण माफ, तर दोन लाखांवरील रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांची दोन लाखांची रक्कम शासन भरणार आहे. ही कर्जमाफी १ एप्रिल २०१९ ते मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत कर्ज सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असेल व मार्च २०२६ पर्यंत परतफेड केले नसलेले कर्जमाफीस पात्र आहे.
या कर्जमाफीचा लाभ २५ हजार व त्याहून अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही म्हणजे अशा वेतनधारकांची नावे कर्जमाफीतून वगळली जाणार आहेत. याशिवाय विद्यमान व माजी मंत्री राज्यमंत्री, खासदार, आमदार, राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य, केंद्र सरकारचे कर्मचारी, महावितरण, एसटी महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कर्मचारी, कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळले आहे.
सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभदेण्यासाठी नाशिक जिल्हा बँकेला शासनाचे कर्जमाफी पोर्टलवर कर्जदारांचा तपशील अपलोड करण्याचे आवाहन केले असता, बँकेच्या वतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे.
अपात्र वगळून कर्जमाफीची रक्कम बँकेकडे जमा होणार
जिल्हा बँकेच्या दोन लाखांच्या आतील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. यामध्ये सर्वच प्रकारचे शेतकरी आहेत. यातून शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कर भरणारे शेतकरी तसेच २५ हजारांहून अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व वगळून कर्जमाफीची रक्कम बँकेकडे जमा होणार आहे