Nashik Simhastha Kumbh Mela -सिंहस्थाच्या सर्वच २८ रस्ते कामांची तपासणी

Nashik Simhastha road projects- सिंहस्थाच्या सर्वच २८ रस्ते कामांची तपासणी
Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh Mela
Published on
Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश देत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी १२३० कोटी रुपये खर्चुन सुरू असलेल्या सर्वच २८ रस्ते प्रकल्पांची नव्याने संयुक्त तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नलदरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला तडे गेल्याची घटना उघड झाल्यानंतर आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

या तपासणीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील तसेच संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंत्यांचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक सर्व रस्ते कामांची नियमित पाहणी करत गुणवत्ता, साहित्याचा दर्जा आणि निविदेतील अटींचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करणार आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ८ ते १० कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मनपाने पहिल्या टप्प्यात १२३० कोटी रुपयांच्या निधीतून २८ प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत.

काही रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण तर काही रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असून, ही सर्व कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, कामे वेळेत पूर्ण करण्याच्या घाईत काही ठेकेदारांकडून गुणवत्तेशी तडजोड होत असल्याचे चित्र समोर आले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, तांत्रिक निकषांचे पालन न करणे आणि घाईघाईने कामे पूर्ण करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी आढळले आहेत. यापूर्वी आयुक्त मनीषा खत्री यांनी विविध रस्ते कामांची पाहणी करत अनियमितता आढळलेल्या १२ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली होती. तरीही काही ठेकेदारांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Nashik Simhastha Kumbh Mela
Gangapur Dam water storage |गंगापूर धरणसमूहाच्या साठ्यात २३ टक्के तूट; जूनमध्ये ५३ मिमी पाऊस

त्र्यंबक रोडवरील खडकाळी सिनल ते आयटीआय सिग्नल या मार्गावरील काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्यावर तडे गेल्याचे उघड झाल्यानंतर आयुक्तांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली. संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन एक लाख ८४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, तडे गेलेला १० मीटरचा रस्ता पूर्णपणे काढून नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्र्यंबक रोडवरील खडकाळी सिनल ते आयटीआय सिग्नल या मार्गावरील काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्यावर तडे गेल्याचे उघड झाल्यानंतर आयुक्तांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली. संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन एक लाख ८४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, तडे गेलेला १० मीटरचा रस्ता पूर्णपणे काढून नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik fake appointment fraud | बनावट नियुक्तीपत्र देत १९.४३ लाखांची फसवणूक

आयुक्तांचा दररोज राहणार 'वॉच'

त्र्यंबक रोडच्या घटनेनंतर आता सिंहस्थाच्या सर्व रस्ते कामांवर अधिक कडक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथक दररोज कामांची तपासणी करणार असून, निविदेतील अटींचे उल्लंघन किंवा निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास निकृष्ट काम काढून पुन्हा करण्याचे आदेशही दिले जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर आयुक्त स्वतः दररोज लक्ष ठेवणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विकास-कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महापालिकेमार्फत सर्व रस्त्यांची दररोज नियमित तपासणी केली जाईल. अतिरिक्त आयुक्तांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, निकृष्ट दर्जाचे कोणतेही काम खपवून घेतले जाणार नाही.

मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news