Anil Aher elected Devla Nagar Panchayat
देवळा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार देवळा नगरपंचायतीच्या स्विकृत नगरसेवकपदी अनिल खंडेराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज (दि. १६) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी तहसीलदार तथा पीठासीनाधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार तथा पीठासीनाधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नामनिर्देशन पत्र व गटनेत्यांच्या शिफारस पत्राचे उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांच्या समोर वाचून दाखवत स्विकृत नगरसेवक पदी अनिल आहेर यांची निवड करण्यात आल्याचे घोषित केले .
यानंतर नूतन स्विकृत नगरसेवक अनिल आहेर यांचा नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, पीठासीनाधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी नगरसेवक जितेंद्र आहेर, भूषण गांगुर्डे, शीला आहेर, कैलास पवार, सुलभा आहेर, राखी भिलोरे, मनोज आहेर, संतोष शिंदे यासह कर्मचारी उपस्थित होते.
आहेर यांची निवड घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी शिवस्मारक परिसरात फटक्यांची आतषबाजी केली .शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आहेर यांचे बाजार समितीचे सभापती योगेश आहेर,संचालक भाऊसाहेब पगार , बाळासाहेब गुंजाळ ,माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, निंबा धामणे, प्रवीण मेधने, प्रदीप सोनवणे, योगेश वाघमारे, अतुल आहेर, बाळासाहेब आहेर, कैलास आहेर, गणेश आहेर, अनिल आहेर, प्रदीप आहेर, दिलीप आहेर, राजेंद्र आहेर, तुषार वाघ, चिंतामण आहेर, हर्षद भामरे, दिलीप मेतकर, श्रावण आहेर, सचिन आहेर, राजेंद्र देवरे आदींनी अभिनंदन केले आहे.