बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या Pudhari
नाशिक

Nashik Leopard Attack | देवळा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार; दोन गंभीर जखमी

भीतीचे वातावरण; बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Leopard Attack On Goats Deola

देवळा : देवळा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (दि. ३१) रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत पशुपालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवळा येथील शेतकरी गंगाधर आहेर यांच्या शेतातील घरालगतच्या शेडमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने या शेळ्यांवर हल्ला चढविला. हल्ल्यात तीन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच वनपाल प्रसाद पाटील व वन विभागाच्या कर्मचारी सुवर्णा इकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत व जखमी शेळ्यांचा पंचनामा केला.

या घटनेमुळे शेतकरी गंगाधर आहेर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना वन विभागामार्फत तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संतोष शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT