सिन्नर (नाशिक): तालुक्यात मे आणि जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे ठाणगावजवळील उंबरदरीसह बोरखिंड आणि कोनांबे ही तीनही धरणे प्रथमच जून महिन्यात तुडुंब भरली.
तीन प्रादेशिक योजनांना मिळाली संजीवनी
पूरपाण्याने बंधारे भरण्याची शेतकर्यांना प्रतीक्षा
एकूण क्षमता : 361 दलघफू
सद्यस्थितीत साठा : 340 दलघफू
पाणलोट क्षेत्रात पाऊस : 237 मिमी
देवनदी प्रवाहित होऊन पूर्व भागात पाणी पोहोचले असून, पूरचार्यांनाही पूरपाणी सोडण्यात आले आहे. तथापि, तालुक्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या चास खोर्यातील भोजापूर धरणात 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. परिणामी धरणावर अवलंबून असलेल्या तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या 32 गावांना दिलासा मिळाला आहे. भोजापूर धरण म्हाळुंगी नदीवर बांधण्यात आलेले आहे.
म्हाळुंगी उगमस्थानी तसेच उंबरदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरकस पाऊस झाल्याने भोजापूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. 361 दलघफू साठवण क्षमता असलेल्या भोजापूर धरणात सोमवारी (दि. 30) सायंकाळपर्यंत 340 दलघफू साठा झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यास दोन दिवसांत अन्यथा पुढील चार ते पाच दिवसांत धरणाचा सांडवा ओसंडून वाहणार आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणामध्ये केवळ 10 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा होता. सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी नदीतून धरणात 50 क्यूसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे. सिन्नर तालुक्यातील मनेगावसह 22 गावे, कणकोरीसह पाच गावे, संगमनेरच्या निमोणसह पाच गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भोजापूर धरणावर कार्यरत आहेत. सिन्नरमधील 27 आणि संगमनेर तालुक्यातील पाच अशा 32 गावांची तहान भोजापूर धरणातील पाण्यावर भागवली जाते. याशिवाय दोडी येथील चार व नांदूरशिंगोटे येथील एक पाणीवापर संस्था कार्यरत आहे. खरीप आणि रब्बीसाठी या संस्था धरणातील पाण्याचा वापर करतात
भोजापूर पूरपाण्यावर पूर्व भागातील दुशिंगपूर तसेच फुलेनगरचा साठवण तलाव भरून घेण्याचे नियोजन असते. दोडी, नांदूरशिंगोटे, संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोणला कालव्यांद्वारेपूरपाणी दिले जातो. धरण लवकर भरणार असल्याने डाव्या कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाने तयारी सुरु केली. कालव्याच्या स्वच्छतेसह अडथळे दूर करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे कनिष्ठ अभियंता शरद नागरे यांनी सांगितले
एप्रिल महिन्यात धरणात केवळ मृतसाठा होता. मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्यामुळे धरणात 12 टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या पंधरवड्यात म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानी झालेल्या जोरदार पावसामुळे हा साठा एकाच दिवसात 65 टक्क्यांवर पोहोचला. मध्यंतरी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे पाण्याची संथगतीने आवक सुरू होती. हा साठा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आह