Assault Pudhari
नाशिक

Nashik |गुंगीकारक पेय देऊन तरुणीवर अत्याचार, सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत शोषण

Nashik |गुंगीकारक पेय देऊन तरुणीवर अत्याचार, सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत शोषण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीला गुंगीकारक पेय देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात सिद्धार्थ पवार (३३, रा. राठी रुंगटा बिल्डिंग, इंदिरानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी बोरिवली येथे फार्मा कंपनीत कार्यरत असून, एप्रिल २०२६ मध्ये इन्स्टाग्रामवरील 'युनिगॅदर' या पेजवरील कार्यक्रमासाठी नाशिक येथे आली होती. दि. ५ एप्रिल रोजी गंगापूर रोडवरील थाई अॅण्ड व्हिस्क कॅफेमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने स्वतःला धाराशिव येथील तसेच अविवाहित असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर मोबाइल क्रमांकांची देवाणघेवाण करून स्ट्रेन्जर्स थिंग्स नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. आरोपीने पीडितेला वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने नाशिकला येण्यासाठी दबाव टाकला होता.

दि. १८ एप्रिल रोजी पीडिता म्हसरूळ येथील बहिणीच्या घरी असताना आरोपी तिला घेऊन गेला होता. त्याच्यासमवेत गौतम लोडा, प्रतीक सोमय्या व स्वप्निल पालवी हे मित्रही होते. गंगापूर रोडवरील आइस्क्रीम पार्लरमध्ये भेट झाल्यानंतर आरोपीने कारमध्ये टेट्रा पॅकमधील ज्यूस देत गुंगीकारक पदार्थ दिला. गुंगीच्या अवस्थेत पीडितेकडून वाढदिवसाचा केक कापून घेतल्यानंतर आरोपीने तिला बराच वेळ कारमध्ये फिरवले व नंतर इंदिरानगर येथील घरी नेले. तेथे ती गुंगीत असताना तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने विचारणा केली असता, आरोपीने जिवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर पहाटे तिला बहिणीच्या घरी सोडण्यात आले.

दुसऱ्या दिवशी आरोपीने पुन्हा तिला जबरदस्तीने मुंबईला नेण्याचा प्रयत्न केला. बोरिवली येथील नॅशनल पार्कजवळ हॉटेलमध्ये जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्नही केला. घटनेनंतर पीडितेने आरोपीच्या मित्रांना माहिती दिली, मात्र उपयोग झाला नाही. अखेर २३ एप्रिलला अशोक स्तंभावरील सौजन्य महिला विकास संस्थेकडे जाऊन तिने पूर्वा मिठाली यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांच्या सल्ल्यानुसार तिने पोलिसांत तक्रार दिली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT