नाशिक

Nashik Crime News | बनावट नोटा छापणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी

गणेश सोनवणे

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिन्नर येथे पाचशेच्या बनावट नोटांची छपाई करून सिडको भागात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अशोक अण्णा पगार (४५, मु. पो. मेंढी ता. सिन्नर जि. नाशिक) याच्यावर कर्ज झाले होते. कर्ज फेडण्याच्या चिंतेत असताना त्यांना मित्र नंदकुमार मुरकुटे (५२, सोनार गल्ली,ता. सिन्नर) भेटला. आपल्या ओळखीचा एक जण बनावट नोटा बनवून देऊ शकतो, असे मुरकूटे याने सांगितल्यानंतर दोघे ठाणे येथे हेमंत लक्ष्मण कोल्हे (३२) याला भेटले. त्यानंतर कोल्हे सिन्नर येथे आला. त्याने एका हॉटेलमधील रूममधे प्रिंटरवर नोटा छापण्याचा प्रयत्न केला. परंतू नोटा व्यवस्थित छापल्या गेल्या नाहीत. नंतर पगार याच्या घरीच ५० बनावट नोटा छापण्यात आल्या. सिडकोतील माऊली लॉन्स या भागात नोटा वठविण्यासाठी आलेल्या पगारला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून ५०० रुपयाच्या ३० बनावट नोटा जप्त केल्या. यानंतर दोघांकडून सतरा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यात पोलिसांनी ४७ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. आरोपींनी एक नोट बाजारात व दोन नोटा बँकेत भरल्याचे पोलिसाना सांगितले.

चौथा आजून फरार

अंबड पोलिसांनी अटक केलेले तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या घटनेतील चौथा संशयित भानुदास वाघ (रा. नांदूर शिंगोटे) हा फरार आहे. संशयित वाघ याच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाले आहेत. वाघला अटक होताच याप्रकरणी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT