नाशिक

Nashik Crime News : कंटेनरमधून तस्करीचा प्रयत्न रोखला, घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त

गणेश सोनवणे

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा:  इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टाके घोटी शिवारातील नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री दिडच्या सुमारास नाशिककडुन मुंबईकडे जाणारा कंटेनर पकडत पोलिसांनी त्यातील २१ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. बुधवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास टाके घोटी शिवारातील महामार्गावर मुंबईकडे गुटखा घेवुन जाणारे कंटेनरची (DD 01 F 9102) स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना माहिती मिळताच पोलीस पथक तैनात करून सापळा रचला. पोलिसांनी कंटेनर थांबवताच चालक आणि त्याचा सहकारी पळुन जाण्याचा प्रयत्न करताच पोलीसांनी त्यांना पकडले. पोलिसांनी कंटेरन तपासला असता त्यात सुगंधित तंबाखू गुटख्याने भरलेल्या गोण्या, विविध बॉक्स असा २५ लाखांचा गुटखा सापडला. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला. पोलिसांनी आरोपी अमृत सिंह (४२, मध्यप्रदेश) व पुनमचंद चौहाण (५२, मध्यप्रदेश) यांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.