विनयभंगातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून फरार file photo
नाशिक

Nashik Crime News | विनयभंगातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून फरार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ओझर पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताने ओझर पोलिस ठाण्यात पाेलिसांच्या हातास झटका मारून फरार झाला. योगेश शंकर माळी (२५, रा. बेघरवस्ती, सुकेणे, ता. निफाड) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे.

ओझर पोलिस ठाण्यात योगेश माळी विरोधात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात योगेशला अटक केली होती. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात नेले जात होते. मंगळवारी (दि.३) लघुशंकेच्या बहाण्याने माळी याने पोलिस नाईक के. एम. कडाळे यांच्या हातास झटका मारून ओझर टाऊनशिप मधील गवतात पसार झाला. त्याचा शोध घेतल्यानंतर तो मिळून आला नाही. याप्रकरणी योगेशच्या शोधासाठी पोलिसांनी तपासी पथके नेमली आहेत.

SCROLL FOR NEXT