नाशिक

Nashik Crime News : हिरावाडी, ध्रुवनगरला दोघांवर प्राणघातक हल्ला 

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हिरावाडी परिसरातील कॅनल रोडवर जमावाने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्री घडली. या हल्ल्यात देवेश अंबरपुरे (२८, रा. जोशीवाडा, हिरावाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. अतुल भोये (२४, रा. पंचवटी) याच्या फिर्यादीनुसार, रात्री ११.३० वाजता घराकडे जात असताना अतुलने संशयितांना गैरसमजूतीतून आवाज दिला. त्यामुळे दहा जणांनी मिळून अतुल भोये व रोहित गांगुर्डे, देवेश यांना मारहाण केली. पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून देवेशला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अजय वळवे (२५) व साहिल उर्फ सोनु गोडे (२२, दोघे रा. फुलेनगर) यांना अटक केली आहे.

ध्रुवनगरला एकावर धारदार शस्त्राने हल्ला

कारागृहातील घटना सांगत असताना मजाक केल्याच्या रागातून दोघांनी मिळून एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना ध्रुवनगर परिसरात घडली. रोशन बरु (३०, रा. संभाजी नगर, सातपूर) याच्या फिर्यादीनुसार, संशयित किशोर राजपूत व पवन यांनी रविवारी(दि.१७) रात्री ८.३० वाजता कुरापत काढून मारहाण केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT