Arrested Pudhari
नाशिक

Nashik Crime Branch | रेकॉर्डवर असलेला सराईत आरोपी जेरबंद

Nashik Crime Branch | खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला रेकॉर्डवरील सराईत आरोपी गुन्हे शाखा युनिट-२ ने शिताफीने जेरबंद केला. प्रवीण उर्फ चाफ्या काळे (२४, रा. कॅनॉल रोड झोपडपट्टी, उपनगर, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला रेकॉर्डवरील सराईत आरोपी गुन्हे शाखा युनिट-२ ने शिताफीने जेरबंद केला. प्रवीण उर्फ चाफ्या काळे (२४, रा. कॅनॉल रोड झोपडपट्टी, उपनगर, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दि. १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी फिर्यादी घरी असताना आरोपी प्रवीणने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने शिवीगाळ व मारहाण करीत धारदार शस्त्राने जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केली व फरार झाला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस हवालदार मनोहर शिंदे व चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, उपनगर परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखा युनिट-२) यांना कळविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला उपनगर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त व सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, संजय सानप, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, तेजस मते, महेश खांडबहाले, प्रवीण वानखेडे व सुनील खैरनार यांनी यशस्वीपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT