नाशिक

Nashik Crime : सिडकोत घरासमोर पार्क केलेली दुचाकी जाळली, अजिंक्य व्हिलेज परिसरातील घटना

गणेश सोनवणे

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडको भागात पुन्हा दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुटवडनगर मोगलनगर परिसरातील शंभूराजे नगर अजिंक्य व्हिलेज परिसरात घरासमोर पार्क करण्यात आलेली दुचाकी मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले असून तपास सुरू केला आहे. (Nashik Crime)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT