जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणणे, त्यासाठी विविध फसवणुकीच्या प्रकारांचा अवलंब करणे, हे कोणत्याही समाजात किंवा कोणत्याही देशात घडले, तरी ते पूर्णपणे अस्वीकारार्हच आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या घटनेने या प्रश्नाला नव्याने अधोरेखित केले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमधील मुलींना आणि महिलांना लक्ष्य करून त्यांना भावनिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर जखडून ठेवत तथाकथित जिहादच्या नावाखाली जे प्रकार घडवले जात होते, ते नाशिक पोलिसांच्या धाडसी आणि संयमी कारवाईमुळे प्रकाशझोतात आले. या घटनांकडे केवळ एका गुन्हेगारी प्रकरणाच्या चौकटीत पाहून चालणार नाही, तर त्यामागील साखळी, त्यामागील मानसिकता आणि त्यासाठी वापरले जाणारे आर्थिक व सामाजिक नेटवर्क यांचा सखोल वेध घेणे अत्यावश्यक आहे.
डॉ. राहुल रनाळकर
गेल्या काही आठवड्यांपासून नाशिकमध्ये उघडकीस येणाऱ्या प्रकरणांनी समाजाला हादरवून सोडले आहे. भोंदगिरी, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक आणि आता कॉर्पोरेट क्षेत्रात पसरलेले लैंगिक व मानसिक शोषण. यातील नव्याने समोर आलेले प्रकरण म्हणजे एका मानांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील मुली महिलांचे शोषण आणि धर्मांतराचा प्रकार. हे एक व्यापक आणि योजनाबद्ध पद्धतीने राबवले जाणारे नेटवर्क असल्याचा संशय अधिक बळावत आहे.
प्रेमाच्या नावाखाली, करिअरच्या आमिषाखाली किंवा भावनिक आधाराच्या नावाखाली मुलींना जाळ्यात ओढले जात होते आणि त्यानंतर त्यांचा वापर केला जात होता, ही बाब अत्यंत गंभीर आहे. प्रेमाला धर्म नसतो ही संकल्पना मानवतेच्या दृष्टीने योग्य असली, तरी या प्रकरणांमध्ये दिसणारे वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. येथे प्रेम हा केवळ मुखवटा आहे. त्यामागे असते, ती व्यवस्थित आखलेली रणनीती. पहिले लक्ष्य ठरवणे, त्यानंतर जवळीक साधणे, विश्वास संपादन करणे आणि शेवटी त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या इतके कमकुवत करणे की, ती स्वतःच्या निर्णयक्षमतेवरही विश्वास ठेवू शकत नाही.
ही प्रक्रिया केवळ भावनिक नाही, तर अनेकदा शारीरिक आणि आर्थिक शोषणातही परिवर्तित होते. या प्रकरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी केलेली अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध तपास प्रक्रिया. खरात प्रकरण समोर येण्याआधीच पोलिस बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील शोषणाच्या या साखळीचा मागोवा घेत होते. आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी मिळवणे आणि तरीही संपूर्ण प्रकरण गुप्त ठेवणे, ही बाब पोलिसांच्या व्यावसायिक क्षमतेचे द्योतक आहे. विशेष म्हणजे, पीडित मुली आणि महिलांची ओळख सुरक्षित ठेवण्यात आली, त्यांना मानसिक आधार देण्यात आला आणि त्यांचा विश्वास जिंकण्यात आला, हे या तपासाचे सर्वात मोठे यश मानावे लागेल. त्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्त्वक्षमतेला आणि एसआयटीप्रमुख संदीप मिटके यांच्या कार्यक्षमतेला सलाम करायलाच हवा. एसआयटीच्या तपासातून समोर आलेल्या बाबी अत्यंत धक्कादायक आहेत.
आरोपी केवळ सामान्य कर्मचारी नसून, अनेक ठिकाणी विभागप्रमुख किंवा प्रभावी पदांवर कार्यरत होते म्हणजेच संस्थेतील अधिकार आणि पदाचा गैरवापर करून हे प्रकार राबवले जात होते. कोणत्या मुलीला लक्ष्य करायचे, तिच्याशी कसे वागायचे, तिला कशा प्रकारे प्रभावित करायचे, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले होते. या गटांमध्ये योजनाबद्ध चर्चा होत होती. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, त्यानंतर त्या मुलीशी मैत्री वाढवणे, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती मिळवणे आणि तिच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करणे, ही प्रक्रिया नियोजनबद्धरीत्या सुरू होत होती.
त्यानंतर सुरू होत असे, गुंतवणुकीचे टप्पे. ऑफिसमधून लवकर जाण्याची मुभा, वेतनवाढीसह प्रमोशनची आश्वासने या माध्यमातून त्या मुलीला संस्थेशी आणि त्या व्यक्तीशी जोडून ठेवले जात होते. हळुहळू भावनिक अवलंबित्व निर्माण करून तिला अशा टप्प्यावर नेले जात होते की, ती नाही म्हणण्याची क्षमता गमावते. काही प्रकरणांमध्ये ब्रेनवॉशिंगसाठी स्वतंत्र गट तयार करून विशिष्ट धर्माविरोधात किंवा विशिष्ट धर्माच्या श्रेष्ठत्वाचे व्हिडिओ सतत पाठवले जात होते. श्रद्धास्थानांबद्दल अविश्वास निर्माण करणे, स्वतःच्या संस्कृतीबद्दल न्यूनगंड निर्माण करणे, ही प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात होती.
अजून एक धक्कादायक बाब म्हणजे यातील काही प्रकरणांमध्ये ड्रग्जचा वापर झाला का, याचाही तपास सुरू आहे. जर हे सिद्ध झाले, तर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढणार आहे. कारण त्यातून हे स्पष्ट होईल की, केवळ मानसिक नव्हे, तर शारीरिक नियंत्रण मिळवण्यासाठीही विविध साधनांचा वापर केला जात होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. अनेक वेळा मुलांच्या वागण्यात होणारे बदल, त्यांच्या संवादात येणारी गुप्तता, अचानक बदललेले मित्रपरिवार या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु या घटनांनी दाखवून दिले आहे की, वेळेवर संवाद साधला, तर मोठे अनर्थ टाळता येऊ शकतात.
अनेक प्रकरणांमध्ये पालकांनी योग्य वेळी मुलींशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेतले आणि त्यातूनच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य द्यावे या संकल्पनेबरोबरच संबाद टिकवून ठेवावा ही जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. अजून एक धक्कादायक बाब म्हणजे यातील काही प्रकरणांमध्ये ड्रग्जचा वापर झाला का, याचाही तपास सुरू आहे. जर हे सिद्ध झाले, तर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढणार आहे. कारण त्यातून हे स्पष्ट होईल की, केवळ मानसिक नव्हे, तर शारीरिक नियंत्रण मिळवण्यासाठीही विविध साधनांचा वापर केला जात होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
अनेक वेळा मुलांच्या वागण्यात होणारे बदल, त्यांच्या संवादात येणारी गुप्तता, अचानक बदललेले मित्रपरिवार या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु या घटनांनी दाखवून दिले आहे की, वेळेवर संवाद साधला, तर मोठे अनर्थ टाळता येऊ शकतात. अनेक प्रकरणांमध्ये पालकांनी योग्य वेळी मुलींशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेतले आणि त्यातूनच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य द्यावे या संकल्पनेबरोबरच संबाद टिकवून ठेवावा ही जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. केली नाही, तर संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र, ही केवळ सुरुवात आहे. पुढेही अशाच पद्धतीने सातत्याने कारवाई झाली, तरच समाजाला या संकटातून बाहेर काढता येईल. शेवटी, या सगळ्या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, धर्माधता कोणत्याही स्वरूपात असो, ती माणुसकीसाठी घातकच असते. जेव्हा धर्माचा वापर माणसाला उन्नत करण्यासाठी न होता, त्याला जखडून ठेवण्यासाठी केला जातो, तेव्हा तो धर्म नसून एक साधन बनतो, शोषणाचे, नियंत्रणाचे आणि वर्चस्वाचे. अशा प्रवृत्तींना वेळीच ओळखून, त्यांचा बंदोबस्त करणे हीच खरी सामाजिक सजगता आहे. माणुसकी, स्वातंत्र्य आणि परस्पर आदर या मूल्यांवर उभा असलेला समाजच खऱ्या अर्थान प्रगत होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला, धर्माच्या आडून चालणाऱ्या शोषणाला आणि मानसिक गुलामगिरीला ठामपणे विरोध करणे, ही काळाची गरज आहे.