Nashik Municipal Corporation 
नाशिक

Caste-based names Nashik report-जातिवाचक नावांच्या बदलाची फेरतपासणी

महापालिकेला अहवाल सादरीकरणाचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, गॅझेट प्रसिद्ध करून अहवाल देणे बंधनकारक, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या

पुढारी वृत्तसेवा

बैठकीत जातिवाचक नावांच्या बदलाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना ठराव करून नावबदलाची कार्यवाही पूर्ण करण्याचे आणि त्याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बदललेल्या नावांचे गॅझेट प्रसिद्ध करून जातिवाचक नावे शिल्लक नसल्याबाबतचा अहवाल सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बदललेल्या ८१ नावांचे गॅझेट प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरात जातिवाचक नावे शिल्लक नसल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाणार आहे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील रस्ते, चौक, वाड्या आणि वस्त्यांना असलेली जातिवाचक नावे बदलण्याच्या मोहिमेची फेरतपासणी पुन्हा सुरू झाली आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील जातिवाचक नावे बदलल्याबाबतचा सविस्तर तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार, शहरातील ८१ ठिकाणांची नावे बदलल्याबाबतचे गॅझेट प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

अहवाल शहरातील अनेक भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने जाती, समाजघटक आणि व्यवसायांचा उल्लेख असलेली नावे रस्ते, गल्ल्या, वाड्या आणि वस्त्यांना देण्यात आली आहेत. सामाजिक सलोखा आणि समता जपण्याच्या उद्देशाने अशी नावे बदलण्याचा निर्णय राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाने घेतला आहे. मे २०२१ मध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून त्यांना नवीन नावे देण्याची कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले होते. या निर्देशांनुसार महापालिकेने शहरातील जातिवाचक नावे असलेल्या वस्त्या, वाड्या, रस्ते आणि चौकांचे सर्वेक्षण केले होते

विशेषतः गावठाण परिसरात अशा नाांच्या गल्ल्या आणि रस्त्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी नगरसेवकांकडूनही जातीचा उल्लेख असलेले नामकरण प्रस्ताव सादर करण्यात आले होते. अशा नावांमुळे सामाजिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन नावे बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. महापालिकेकडे अशा नावांमध्ये बदल करण्यासाठी ८१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांना महासभेने मंजुरीही दिली होती. मात्र, काही ठिकाणी नावबदलाला विरोध झाल्याने प्रक्रिया रखडली होती. आता शासनाने या विषयाची फेरतपासणी सुरू केल्याने प्रलंबित कार्यवाहीला पुन्हा वेग आला आहे.

विभागनिहाय बदललेली नावे -

पूर्व विभाग : जुनी तांबट गल्ली- ओंकार लेन, कुंभारवाडा- भूमी नगर, माळी गल्ली- निसर्ग गल्ली, तेली गल्ली-रामशेज गल्ली, मातंग वाडा स्वाभिमान नगर, राजवाडा प्रगतीनगर, कोकणीपुरा जनतानगर, कोळीवाडा-कौशल्यनगर, माळी गल्ली- निर्मल गल्ली, बुरुड गल्ली- यशवंत गल्ली, जोगवाडा- शस्यूनगर, मुल्तानपुरा- शहीदनगर, साळी गल्ली - शांतीनगर, काजीपुरा इन्कलाब नगर, वैदूवाडी- अहिंसानगर, आदिवासी वाडा- क्रांतीनगर, माळी गल्ली-उपासनानगर, रामोशी वाडा- सहकारनगर.

पश्चिम विभाग : नवीन तांबट लेन- संस्कृती लेन, लोणार लेन- विवेक लेन, मातंगवाडा मुक्तीवाडा, ख्रिश्चनवाडी- जयपूरनगरी, कुंभारवाडा धरतीनगर, साळीवाडा स्नेहनगर, जुने तांबट लेन चैतन्य लेन, काजीगडी- गोदागडी.

पंचवटी विभाग : वैदूवाडी- पैनगंगा नगर, मांगवाडा- नर्मदानगर, धनगर गल्ली- जय हिंद नगर, जोशीवाडा- रायगड नगर, तांबोळीनगर- वेदश्रीनगर, भराडवाडी- रायरेश्वर नगर, वडारवाडी- रामशेजनगर, मोठा राजवाडा- सिंधूनगर. नाथ गल्ली- आनंदी नगरी, पाथरवट लेन कमलनयन लेन, कोमटी गल्ली देवगिरी नगरी, भोईवाडा- जनस्थान नगर, कुंभार गल्ली- कलाकृतीनगर, चांभार गल्ली- त्रिकटक नगर, कोळीवाडा- हुतात्मानगर.

नाशिकरोड विभाग : बौद्धवाडा- समतानगर, गोसावीनगर- आराधनानगर, गवळीवाडा- राधानगरी, बौद्धनगर-नालंदानगर, लिंगायत कॉलनी तक्षशिला कॉलनी, गोसावीवाडी जुईनगर, धोबी गल्ली- कल्पवृक्षनगर, महावीरनगर - रायगडनगर, जैन कॉलनी- सम्यकनगर, बौद्धवाडा- गोकुळधाम, मांगवाडा- गोवर्धननगर, धनगर गल्ली-टायगर गल्ली, तेली गल्ली प्रगतीनगर, भोई गल्ली- विकासनगर, वाल्मीकनगर निर्माणनगर, कुंभार गल्ली-कुशलनगर, चांभारवाडा- क्रांतीनगर, लोहार गल्ली- कामगारनगर.

सिडको विभाग : हाजीनगर- खुशबूनगर, झिनतनगर- महेकनगर, हरदास कॉलनी- गुंजन कॉलनी, भिलवाडा-सहजीवन नगर, कोळीवाडा- श्रमिकनगर, कोळीवाडा- कर्मयोगीनगर, विश्वकर्मा- आविष्कारनगर.

सातपूर विभाग : कोळीवाडा-गोदावरीनगर, जोशीवाडा- रायगडनगर, कोळीवाडा- सागरवाडा, कोळीवाडा-अंजनेरी नगर, माळी कॉलनी- मयूर कॉलनी, कोळीवाडा- नंदिनीनगर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT