City Link Nashik Pudhari file photo
नाशिक

Citilink Bus Route | नाशिककरांनो लक्ष द्या! नाशिकरोड बसस्थानकातील काँक्रीटीकरणामुळे सिटीलिंक मार्गात 29 सप्टेंबरपासून मोठे बदल

Citilink Bus Route | नाशिकरोड बसस्थानकातील काँक्रीटीकरणामुळे निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड बसस्थानकात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे सिटीलिंक शहर बससेवेच्या फेऱ्या, बसथांबे आणि मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. पोलिस उपायुक्त (मुख्यालय / वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना दि. २९ सप्टेंबर ते २० डिसेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे.

नाशिकरोड बसस्थानकातील काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे बसस्थानक पूर्णपणे रिकामे होणार आहे. त्यामुळे सिटीलिंक बससेवेतील काही मार्गांमध्ये बदल करून पर्याय मार्ग निश्चित केले आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानक ते त्र्यंबकेश्वर फेरीसाठी मार्ग क्रमांक २८४ आणि १४५ असून, या मार्गावर अनुक्रमे ३० व १८८ फेऱ्या आहेत.

नाशिकरोड रेल्वेस्थानक ते द्वारका मार्गासाठी २७० क्रमांकाच्या मार्गावर १५ फेऱ्या आणि १२४ फेऱ्या निश्चित केल्या आहेत. पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे सकाळी ८.४५ ला येणाऱ्या गाडीच्या वेळेनुसार शहरातील विविध मार्गांच्या पाच बसेस एकाच वेळी नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे थांबविण्याची व्यवस्था केली आहे.

रात्री रेल्वेने नाशिकरोड येथे येणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वेस्थानक ते शहर बसस्थानकापर्यंत बससेवा सुरू राहणार आहे. तसेच तपोवन ते सिन्नर फेरी मार्गातही बदल केला आहे. बिटको चौकातून सिन्नर फाटामार्गे जाणाऱ्या बसचा मार्ग नाशिकरोड पोलिस ठाणे, विभागीय आयुक्त कार्यालय, पाटी, उड्डाणपूल अशा मार्गाने निश्चित केला असून, पुढे सिन्नर फाटा, उड्डाणपूल, शिवाजी महाराज चौक, बिटको चौक आणि दत्तमंदिर चौकामार्गे बससेवा सुरू राहणार आहे.

शहरातील इतर मार्गांवरील सिटीलिंक बस आगारातून सुटून पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरही आवश्यक बदल केले आहेत. या बदलानुसार प्रवाशांनी बसस्थानकावरील सूचना, मार्गदर्शक फलक आणि सिटीलिंकच्या अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

बदलांची रूपरेषा (चौकट)

अधिसूचना कालावधी : २९ सप्टेंबर ते २० डिसेंबर २०२६ (कालावधी: ३ महिने)
नाशिकरोड रेल्वेस्थानक-त्र्यंबकेश्वर : मार्ग क्र. २८४ व १४५ (फेऱ्या: ३० व १८८)
नाशिकरोड रेल्वेस्थानक - द्वारका : मार्ग क्र. २७० (फेऱ्या: १५ व १२४)
पंचवटी एक्स्प्रेससाठी विशेष व्यवस्था : ५ बसेस (वेळ: सकाळी ८.४५ वाजता)
तपोवन - सिन्नर मार्गावरील फेऱ्या : १५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT