Nashik Citilinc Lucky Draw 2026 
नाशिक

Nashik Citilinc Lucky Draw 2026 | नाशिककर महिलांसाठी आनंदाची बातमी! सिटीलिंकमधून महिनाभर मोफत प्रवासाची संधी; 'असा' घ्या स्पर्धेत भाग

Nashik Citilinc Lucky Draw 2026 | 15 भाग्यवान महिलांना मिळणार महिनाभर मोफत प्रवास

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिला दिनानिमित्त सिटीलिंकतर्फे महिला प्रवाशांकरिता लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत १५ भाग्यवान महिलांना संपूर्ण मार्च महिन्यात मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे. सिटीलिंक बससेवेचा लाभघेणाऱ्या महिला प्रवाशांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

दि. ६ व ७ मार्च २०२६ असे दोन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नाशिकरोड बसस्थानक, सिव्हिल हॉस्पिटल (नवीन सीबीएस) तसेच पंचवटी कारंजा येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन लकी ड्रॉ बॉक्स ठेवण्यात येणार आहेत.

दि. ६ व ७ मार्च रोजी महिला प्रवाशांनी आपला बसप्रवास पूर्ण झाल्यानंतर तिकिटावर मोबाइल क्रमांक नमूद करून ते तिकीट संबंधित लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकायचे आहे. एकूण प्राप्त तिकिटांमधून १० भाग्यवान महिला प्रवाशांची निवड Listen लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येईल. त्याचप्रमाणे सिटीलिंकचा पास वापरत असणाऱ्या महिलांकरितादेखील लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यातून ५ भाग्यवान महिला पासधारक प्रवाशांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येईल.

तिकीट लकी ड्रॉमधून १०, तर पास लकी ड्रॉमधून ५ अशा एकूण १५ भाग्यवान महिला प्रवाशांना मार्च २०२६ या महिन्यात सिटीलिंक बसमधून मोफत प्रवासाची विशेष सुविधा देण्यात येणार आहे.

महिलांसाठी सेल्फी पॉइंट

महिला दिनानिमित्त सिटीलिंकच्या वतीने नाशिकरोड रेल्वे स्थानक आणि पंचवटी कारंजा या ठिकाणी महिला प्रवाशांकारिता खास 'आय राइड विथ प्राइड-सिटीलिंक' या थीमवर सेल्फी पॉइंटदेखील तयार करण्यात आले. याठिकाणीदेखील महिला प्रवाशांनी आपले सेल्फी काढून citilincwithher यावर टॅग करावे, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT