भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप तंत्रज्ञान वापरणार File Photo
नाशिक

Cidco Stray Dog | सिडकोत मोकाट श्वानांची फौज, गल्लोगल्ली सुरक्षाप्रश्न ऐरणीवर

Cidco Stray Dog | दरमहा १५० रहिवासी जखमी, नागरिकाच्या मृत्यूनंतर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सिडको परिसरात भटक्या श्वानांचा वाढता सुळसुळाट नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत असून, खुटवडनगर भागात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिडकोत महिन्याला सुमारे १५० शाळकरी मुले, महिला आणि नागरिक जखमी होत आहेत.

नाशिक महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, सिडको भागात दररोज सरासरी ८ ते १० जणांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत असून, दरमहिन्याला सुमारे १०० शाळकरी मुले, महिला आणि नागरिक जखमी होत आहेत.

सिडको, खोडेमळा, वृंदावन कॉलनी, खांडेमळा, कर्मयोगीनगर, सदाशिवनगर, गोविंदनगर, खुटवडनगर, अंबड, पाथर्डी फाटा, पाथर्डी गाव तसेच परिसरातील विविध कॉलनींमध्ये भटक्या श्वानांच्या झुंडी फिरत आहेत. पहाटे व रात्रीच्या वेळी रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती सतावत आहे.

अनेक ठिकाणी कुत्र्यांची टोळकी वाहनचालकांचाही पाठलाग करत असल्याने अपघातांचा श्वानांचे धोकाही वाढला आहे. महापालिकेने भटक्या निर्बिजीकरण, लसीकरण, पुनर्वसन आणि आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

कारवाईची मागणी

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासंदर्भातील न्यायालयीन निर्देशांचा उल्लेख करत नागरिकांनी प्रशासनाने कायदेशीर चौकटीत प्रभावी कारवाईची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT