चांदवड (नाशिक) : जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील निमोण गावाने राबवलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण मुंबईत पार पडले. देशभरातून आलेल्या विविध संस्था, तज्ज्ञ व लाभार्थ्यांसमोर निमोणच्या सरपंच डॉ. स्वाती देवरे यांनी 'जल-जंगल-जमीन' या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
ग्रामविकासात पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. देवरे म्हणाल्या की, शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक प्रकल्पांची अंमलबजावणी आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे गावाला शुद्ध हवा, नैसर्गिक समतोल तसेच रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतात. राज्यातील प्रत्येक सरपंचाने पर्यावरण विकासाचा मुद्दा गांभीर्याने हाती घेऊन गावाचा शाश्वत विकास साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांतकुमार यांनी डॉ. देवरे यांच्या कार्याचे कौतुक केले. देशातील प्रत्येक गावात असे दूरदृष्टी असलेले सरपंच असतील तर भारत जागतिक हवामान बदलाच्या लढ्यात अग्रणी भूमिका बजावेल. अशी गावे जागतिक पातळीवर पर्यावरणीय नेतृत्व करतील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. दरम्यान, राह फाउंडेशनच्या 'प्रोजेक्ट री-ग्रीन नेशन' अंतर्गत निमोण गावात सुरू असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कबाबत माहिती दिली. आतापर्यंत ९ हजारांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात नक्षत्र वन, ट्री लायब्ररी आणि फुलपाखरू उद्यान उभारण्याचे नियोजन सुरू आहे. उपक्रमासाठी शासन, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास समिती तसेच ग्रामस्थांचे सहकार्य मिळत