Ashok Kharat Case 
नाशिक

Ashok Kharat Case | नाशिकच्या 'भोंदू' बाबाच्या भक्तीत आमदार पत्नीही? अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरात महिला लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यभर खळबळ उडविल्यानंतर आता या प्रकरणात नवे आणि धक्कादायक पैलू समोर येत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात महिला लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यभर खळबळ उडविल्यानंतर आता या प्रकरणात नवे आणि धक्कादायक पैलू समोर येत आहेत. तपासाच्या दरम्यान खरातच्या 'विशेष भक्त परिवारात' एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याची चर्चा सध्या शहरासह जिल्ह्यात जोर धरत आहे.

अधिकृत पातळीवर कोणतीही नावे जाहीर करण्यात आलेली नसली, तरी या चर्चेमुळे प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच गडद होत आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, विविध क्षेत्रांतील महिला, राजकारण, प्रशासन आणि इतर उच्चपदस्थ कुटुंबांतील व्यक्ती खरातच्या संपर्कात असल्याचे तपासातून पुढे येत आहे.

गोपनीयतेच्या कारणास्तव संबंधितांची नावे अद्याप उघड करण्यात आलेली नसली, तरी एका व्यक्तीच्या प्रभावाखाली इतक्या मोठ्या संख्येने महिला कशा काय आल्या, याबाबत सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खरातच्या अटकेनंतर तपास अधिक वेगाने पुढे सरकत असून, एकामागून एक नवे खुलासे होत आहेत. त्याच्या संपर्कात अनेक प्रभावशाली व्यक्ती असल्याचेही समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर 'आमदार पत्नी'च्या सहभागाची चर्चा अधिकच रंगू लागली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती नेमकी कोण, याबाबत विविध स्तरांवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, तपास यंत्रणा सखोल चौकशी करत असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT