TCS Nashik Case Pudhari
नाशिक

Nashik TCS Case | टीसीएस कथित लैंगिक शोषण अन् धर्मांतर प्रकरण; संशयित निदा खानसह तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

Nashik TCS Case | न्यायालयाकडून निदा खानला दिलासा मिळणार की, तिची कोठडी कायम राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान, दानिश एजाज शेख व तौसिफ बिलाल अत्तार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी नाशिकरोड न्यायालयाने १२ जूनपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे निदा खानला सध्या तरी कारागृहातच राहावे लागणार असून, तिच्या जामिनाबाबतचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे.

या बहुचर्चित प्रकरणाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाकडून निदा खानला दिलासा मिळणार की, तिची कोठडी कायम राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रकरणात निदा खानसह अश्विनी चेनानी, तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरूख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफीक मेमन यांचाही समावेश आहे. यापैकी काही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, अश्विनी चेनानी आणि निदा खान या मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत न्यायालयात नऊ आरोपपत्रे दाखल केली आहेत. तपासादरम्यान विविध धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. १२ जूनला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT