Nashik fraud Case  
नाशिक

Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरातचा अमानुष चेहरा! अल्पवयीन मुलीला केबल वायरने करंट देऊन केला अत्याचार

Ashok Kharat Case | बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरात भोंदू अशोक याच्याविरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरण अधिकच गंभीर बनत असून, तपासादरम्यान एकामागून एक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. अटक प्रक्रियेच्या वेळी पोलिसांना तुम्ही घोर अपराध करत आहात, अशी धमकी देणाऱ्या खरातचे नवनवीन कारनामे समोर येत आहे.

या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष तपास पथकाने महत्त्वाची कारवाई करत तीन वेगवेगळ्या पीडित महिलांचे जबाब नोंदवले. या जबाबांमुळे आरोपीकडून दीर्घकाळ फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचा संशय अधिकच बळावला आहे. याचबरोबर या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नीरज जाधव यास पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली आहे.

त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात खरातविरोधात आणखी एक लैंगिक शोषण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे या प्रकरणातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपास अधिक खोलवर जात असताना आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याचवेळी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, खरातने केबल वायरने करंट देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्वास मिळवत त्याने अनेकांना जाळ्यात ओढत त्यांच्यावर अमानुष कृत्ये केल्याचे उघड होत आहे. मीरगाव येथील नागरिकांनी या प्रकरणावर आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांचीही वेळोवेळी फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

काहींना धमकावल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. दरम्यान, मीरगाव येथील ट्रस्टच्या मंदिर व फार्म हाउससाठी दिला जाणारा अतिरिक्त पाणीपुरवठा जलसंपदा विभागाने तातडीने बंद केला आहे. माध्यमांत यासंदर्भात माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, पोलिसांकडून अत्यंत गोपनीयतेने सखोल तपास सुरू आहे.

मैत्रीच्या जाळ्यातून २० कोटींची उकळपट्टी

उद्योगपतीसह आमदार पुतणीला ब्लॅकमेल नाशिक : पुढारी वृत्तसेवा भोंदू अशोक खरात याच्या विरोधातील प्रकरणात आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्याबरोबरच तो अनोळखी व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत असल्याचे उघड झाले आहे. या नव्या प्रकारामुळे खरातच्या कारवायांची व्याप्ती अधिकच व्यापक आणि गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT