Nashik Apollo Hospital Kidney Transplant 
नाशिक

Nashik Apollo Hospital Kidney Transplant |आधुनिक युगातील सावित्रीकडून पतीला किडनी दान करीत नवजीवन

अपोलो हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील चांदवड येथील खंडू काशीनाथ आहेर (५४) यांना पत्नी सुनीता खंडू आहेर यांनी किडनी दान करून नवजीवन दिल्याची प्रेरणादायी घटना नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली.

आहेर हे दीर्घकाळ किडनी विकाराने त्रस्त असून डायलेसिसवर होते. सुमारे दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पत्नीची किडनी जुळल्यानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. खराब किडनी काढून नवीन किडनीचे प्रत्यारोपण अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले असून, रुग्णाची प्रकृती स्थिर आहे व नवीन किडनीचे कार्य समाधानकारक आहे.

ही शस्त्रक्रिया किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. प्रकाश उगले, प्रत्यारोपण सर्जन डॉ. प्रवीण गोवर्धने, डॉ. किशोर वाणी व डॉ. अभयसिंह वालिया यांच्या पथकाने केली. संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय टीम, परिचारिका व आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

रुग्णालय प्रशासनानुसार अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे आतापर्यंत २०० हून अधिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. या प्रसंगी रुग्णालयाचे सीओओ दीप्तेन्दू पांडा यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करीत 'अवयवदान हेच जीवनदान' असा संदेश दिला. या घटनेतून अवयवदानाबाबत समाजात जागरूकता वाढावी, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT