MD Drug News : पोलिस पुत्रासह तिघे एमडी ड्रग्ज विक्री करताना ताब्यात pudhari file photo
नाशिक

Nashik Ambad Police MD Drugs Raid | एमडी ड्रग्ज विकणारा संशयित ताब्यात

Nashik Ambad Police MD Drugs Raid | एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ विक्रीसाठी ठेवलेल्या विक्की संतोष वाकळे याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८ ग्रॅम एमडी, आयफोन मोबाइल व रोख रक्कम असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ विक्रीसाठी ठेवलेल्या विक्की संतोष वाकळे याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८ ग्रॅम एमडी, आयफोन मोबाइल व रोख रक्कम असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलिसांकडून अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम राबविली जात आहे.

त्यानुसार अंबड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने १४ जून रोजी सीपीडब्ल्यूए व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे महालक्ष्मीनगर येथील सोनाली वाइन्सजवळ गणेश स्नॅक्स अॅण्ड कोल्ड्रिक्स परिसरात सापळा लावत संशयित विक्की संतोष वाकळे (२३, रा. हनुमान मंदिराजवळ, कामटवाडे गाव, अंबड) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीत त्याच्याकडे ८ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), आयफोन आणि रोख चार हजार रुपये आढळून आले.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, कॉन्स्टेबल उल्हास गांगुर्डे, फरीद इनामदार, अनिल गाढवे, मयूर पवार यांच्या पथकाने केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.

पोलिस निरीक्षक अविनाश नडविणकेरी (गुन्हे), पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, योगेश देसले, सुभाष ठुबे, सागर जाधव, समाधान शिंदे, फरीद इनामदार, मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, अनिल गाढवे, तुषार मते, वैभव एखंडे, सचिन करंजे आणि योगेश सिरसाट यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT