मालेगाव : सटाणा - मालेगाव रस्त्यावरील आघार बुद्रुक शिवारात पंचमहल दूध डेअरीजवळ ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रकमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला.
अपघातात ठार झालेल्यांमध्ये राज तात्या ठाकरे (20) व ललित संजय सोनवणे (20) या दोघांचा समावेश असून, ईश्वर अनिल देवरे (20) तिघे रा. अजमीर सौंदाणे हा जखमी झाला आहे. हे तिघे तरुण मालेगावहून ट्रकने (एमएच 47, वाय 5752) सटाण्याकडे जात असताना समोरून भरधाव आलेल्या कंटेनरने (केए 01, एके 5104) जोरदार धडक दिली. यात दोघे ठार व एक जखमी झाला. मयत ठाकरेचे काका बाळू ठाकरे यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक ए. बी. नवले तपास करीत आहेत.