Nashik Ration Card 
नाशिक

Nashik Ration Card | नाशिकमध्ये दोन महिन्यांत 9 हजार नवीन रेशन कार्डचे वाटप; तुम्हालाही मिळू शकते संधी!

Nashik Ration Card | नाशिक जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत सुमारे ३६ लाख ६२ हजार ११७ लाभार्थी आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शिधापत्रिकांचे सुसूत्रीकरण आणि नव्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यावर भर दिला जात असून, गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात सुमारे नऊ हजार नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत सुमारे ३६ लाख ६२ हजार ११७ लाभार्थी आहेत. यात अंत्योदय अन्न योजनेचे ७ लाख २६ हजार ३०३, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे २९ लाख ३५ हजार ८१४ लाभार्थी आहेत.

मिशन सुधार अभियानांतर्गत अपात्र शिधापत्रिकाधारकांची पडताळणी करून, त्यांची नावे वगळण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत कोणतेही पात्र कुटुंब अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासन घेत आहे. यासाठी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नव्याने पात्र ठरणाऱ्या कुटुंबांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ नवीन शिधापत्रिका दिल्या जात आहेत.

तसेच जुन्या शिधापत्रिकांमध्ये कुटुंबातील नव्या सदस्यांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रियाही राबविण्यात येत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या प्रवाहात आणण्यास मदत होत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, मिशन सुधार अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करतानाच पात्र कुटुंबांना धान्याच्या लाभापासून वंचित राहू दिले जाणार नाही.

नवीन शिधापत्रिका देण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. गरजू आणि पात्र कुटुंबांना शासनाच्या अन्नधान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पुरवठा यंत्रणा कटिबद्ध असल्याचे नमूद करतानाच, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणीही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी पुरवठा विभागाकडून आवश्यक काळजी घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT