मनमाड (नाशिक) : शहरात रविवार (दि. २१) परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. सायंकाळी ४ वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाने आठवडे बाजारासाठी आलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाने पिकांना फटका बसत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सलग पाऊस होत असला तरी उकाडा मात्र कायम आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर सलग झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, तूर, कपाशी, कांदा पिकाची लागवड केली. दमदार पावसामुळे पिके देखील जोमात आली. मात्र गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. रविवारी (दि. २१) आठवडी बाजारही पाण्यात गेल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.