नाशिक (पुढारी वृत्तसेवा):
मुंबईतील चेंबूर पोलीस ठाणे हद्दीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा अंबड युनिट-३ च्या पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेत मुलीची सुखरूप सुटका केली.
प्रशांत ठाकरे उर्फ रवि गायकवाड (३४, रा. पोस्टल कॉलनी, चेंबूर, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ३१) अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यातील अपहृत मुलगी नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. १२) पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचला होता. यावेळी पोलीस अमलदार गौरव धात्रक यांनी अपहृत मुलीला ओळखले.
महिला पोलीस अमलदारांच्या मदतीने मुलीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी प्रशांत गायकवाड हा मुलीला आमिष दाखवून पालकांच्या कायदेशीर ताба ातून पळवून नेत असल्याची माहिती समोर आली. आरोपीने मुलीला विविध ठिकाणी नेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपीला ताब्यात घेऊन अपहृत मुलीससह पुढील कायदेशीर कारवाईसाठी चेंबूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, राजेश महाले, महेंद्र दोंदे, गौरव धात्रक, चारुदत्त निकम, हर्षल जाधव, अरुण चव्हाण आणि अमलदार सविता कदम यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.