नगरसुल : पुढारी वृत्तसेवा
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे कोटमगाव येथील विठ्ठल मंदिरात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने येवला कोटमगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत मनोभावे दर्शन घेतले. तसेच चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. यावेळी उपस्थित भाविकांना मंत्री छगन भुजबळ यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, सरपंच राजेंद्र काकळीज, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, विशाल परदेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.