Jail Pudhari
नाशिक

MHADA scam arrests | म्हाडा घोटाळ्यात काजळे, पाटील यांची तुरुंगात रवानगी

MHADA scam arrests | म्हाडा घोटाळ्यात काजळे, पाटील यांची तुरुंगात रवानगी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा जमीन घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे आणि नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासादरम्यान बिपीन काजळे यांच्या कार्यालयात झडती घेण्यात आली असता बनावट शिक्के आढळून आले. या शिक्क्यांच्या आधारे जमिनींच्या आरक्षणात फेरफार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या नायब तहसीलदार नितीन पाटील याने ४९ पैकी ३१ प्रकरणांत बनावट नकाशांवर मंजुरी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

अधिकारी, कर्मचारी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या संगनमतातून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे. या कारवाईमुळे महसूल व नगररचना विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांचा तपास आता इतर संशयित अधिकारी, तलाठी आणि बिल्डर लॉबीकडे वळला असून, आणखी अटकसत्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT