नाशिक

Meri Mati Mera Desh : ‘मेरी माटी मेरा देश’साठी सजविले पंचायत कार्यालय 

गणेश सोनवणे

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा; शासनाने घालून दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी तंतोतंत करीत असतात. याचाच प्रत्यय भुसावळ पंचायत समितीमध्ये आला. एक सारखे ड्रेस त्यावर फेटा आजूबाजूला फुलांच्या पाकळ्यांनी केलेली रांगोळी रस्त्यावर टाकलेली फुले. अशा सर्व प्रसन्न वातावरणात सकाळपासून अधिकारी ते कर्मचारी गुंग होते. कार्यक्रम होता 'मेरी माटी मेरा देश' तालुक्यातील माती जमा करून ती जिल्हा ठिकाणी पाठवणे यासाठी सर्वच सजले सवरलेले होते. मात्र सकाळपासून कोणतेही कामकाज कार्यालयात होताना दिसून येत नव्हते. जन्मदाखल्यासाठी आलेले नागरिकांनाही दुपारून येण्याची सांगून परत पाठविले. (Meri Mati Mera Desh)

माझी माटी माझा देश या कार्यक्रमाची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्यानुसार राजकीय पक्ष, शासकीय कर्मचारी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत किंवा तसे आदेशही त्यांना मिळालेले आहेत. असाच कार्यक्रम आज भुसावळ येथील पंचायत समितीमध्ये होणार होता. यासाठी तालुक्याचे आमदार संजय सावकारे हे उपस्थित राहणार होते. मुख्य म्हणजे गेल्या दीड वर्षापासून भुसावळ पंचायत समितीला गटविकास अधिकारी हे पद रिक्त होते. नुकतेच या ठिकाणी रुजू झालेले सचिन पांनझोडे यांनी पदभार स्वीकारला आहे. यात आज माझी माटी माझा देश या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समितीच्या कार्यालयात करण्यात आले होते. यासाठी मुख्य गेटजवळ स्वागत अशी रांगोळी, इमारतीच्या अंगणामध्ये मोठी भव्य अशी रांगोळी, त्याच्या आजूबाजूला फुलांच्या पाकळ्यानी सजवलेली रांगोळी. याबरोबर अधिकारी व कर्मचारी यांनी जवळपास एकसारखे ड्रेस घातले होते. यामध्ये कर्मचारी यांनी फेटे बांधलेले होते. त्यामुळे या ठिकाणी कोणी लग्नाची वरात नाही तर फक्त या कार्यक्रमासाठी सकाळपासून सगळे जोमाने तयारीला लागलेले होते. ही तयारी करीत असताना पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या कामकाजाकडे सर्वच दुर्लक्ष करीत असताना दिसून आले. जो तो रांगोळी, फुलं किंवा फेटे बांधण्यात व्यस्त होता.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास कडगाव येथील भुसावळ तालुक्यातील जळगाव येथे जन्म घेतलेल्या नीलम कोळी यांच्या जन्म दाखला घेण्यासाठी आले असता पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी नसल्याने संबंधित कार्यालयीन शिपाई यांनी तुम्ही दुपारी किंवा उद्या येण्याचा सल्ला देऊन त्यांना परत पाठविले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT