मसाजच्या पडद्याआड देहविक्रीचा बाजार Pudhari News Network
नाशिक

Massage Parlour Raid | कुंटनखाना प्रकरणी 'खुशबू सुराणा'ला पोलिस कोठडी

Nashik Crime : पती परेश सुराणा पसार; पोलिसांकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार चालविणाऱ्या कुंटुनखाण्यावर पोलिसांचा छापा

  • यापूर्वी देखील संशयित खुशबू सुराणा आणि परेश सुराणा यांच्यावर गुन्हे दाखल

  • मुंबई नाका पाेलिसांच्या हद्दीतील मेट्राेझाेन कमर्शिअल काॅम्प्लेक्समधील 'आरंभ स्पा' सेंटर

Nashik Massage Parlour Raid

नाशिक : मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या संशयित खुशबू सुराणा हिला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (दि.21) रात्री उशिराने गुन्हेशाखेने धाड टाकत हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता. कारवाई पाच पीडित महिलांचीही सुटका केली होती. दरम्यान, यापूर्वीच संशयित खुशबू आणि परेश सुराणा यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (दि. २१) पोलिस पथकास मुंबई नाका पाेलिसांच्या हद्दीतील मेट्राेझाेन कमर्शिअल काॅम्प्लेक्समधील 'आरंभ स्पा' सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गाेपनीय माहिती मिळाली होती. यानंतर, पथकाने छापा टाकला. तेव्हा संशयित खुशबू परेश सुराणासह पाच पीडिता आढळून आल्या. खुशबू ही पीडितांकडून जबरीने अनैतिक काम करून घेत असल्याचे आढळून आले. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात खुशबूसह तिचा पती परेश यांच्यावर पीटाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेशचा शाेध सुरू असून दाम्पत्याने पुन्हा एकदा नाशिकमध्ये अनैतिक व्यवसाय थाटल्याचे समाेर आले आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यावरून आरोप-प्रत्यारोप

खुशबूने कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम व महाराष्ट्र या राज्यातून पाच पीडितांना भूलथापा देऊन नाशिकमध्ये आणून या व्यवसायात ढकलले. मेट्राेझाेनमधील गाळा तिने गेल्या महिनाभरापूर्वीच घेतला हाेता. दरम्यान, शिवसेना- शिंदे गटाचा नाशिकमधील तत्कालिन पदाधिकारी किरण फडाेळ याच्याविराेधात गंगापूर पाेलिसांत काही महिन्यांपूर्वी खुशबू सुराणा हिने बलात्काराची फिर्याद दाखल केली हाेती. त्याने पत्रकार परिषद घेत खुशबूवर आराेप करून 'मला खाेट्या गुन्ह्यांत गाेवल्याचे म्हटले हाेते. त्यानंतर फडाेळच्या प्रश्नांना उत्तर म्हणून खुशबूनेही पत्रकार परिषद घेत किरणचे आराेप फेटाळून लावले हाेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT