Manmad Municipal Council 
नाशिक

Manmad Municipality | मनमाड नगरपालिकेची मोठी कारवाई! 22 कोटींची थकबाकी वसुलीसाठी दुकाने अन् मालमत्ता सील

Manmad Municipality | मनमाडकरांनो सावधान! घरपट्टी-पाणीपट्टी थकवली तर मालमत्ता जप्त होणार

पुढारी वृत्तसेवा

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

शहरातील नागरिकांकडे पाणीपट्टी, घरपट्टी, गाळाभाडे यांसह इतर करांपोटी तब्बल २२ कोटी ५७ लाखांहून अधिक थकबाकी असल्यामुळे पालिका आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांनी कोट्यवधी रुपये थकविल्यामुळे शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे. करांची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे.

मोहिमेंतर्गत गाळे व दुकाने, हॉटेल्स, इतर मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. पाणीपट्टी थकविणाऱ्या नळधारकांचे नळ कनेक्शनही बंद केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली. थकीत कर नाही भरले, तर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करू, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या मनमाड शहरात सुमारे आठ हजारांहून अधिक मालमत्ताधारक असून, त्यात १४ हजारांहून अधिक निवासी, तर ४ हजार वाणिज्य मालमत्तांचा समावेश आहे.

यंदा नोव्हेंबरपर्यंत नागरिकांकडे घरपट्टीपोटी तब्बल ११ कोटी ७३ लाख १४ हजार ६५२ रुपये थकीत आहेत. शहरात नळधारकांची संख्या सुमारे ११ हजारांहून अधिक असून, त्यात हॉटेलसह इतर व्यवसायांसाठी वापरले जाणारे नळ कनेक्शनही आहेत. शहरात पालिकेचे २६ व्यावसायिक संकुल असून, त्यात ४१६ गाळे आहेत. गाळेभाडे थकविणाऱ्यांत मोठे व्यावसायिक अन् राजकीय मंडळीही आहेत.

थकबाकी रक्कम

  • घरपट्टी : ११ कोटी ७३ लाख

  • पाणीपट्टी : ७ कोटी ५२ लाख

  • गाळे भाडे : ३ कोटी ३२ लाख

  • एकूण : २२ कोटी ५७ लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT