Swati Chavan Nilesh Jejurkar Pudhari
नाशिक

Manisha Jejurkar Case: मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी डॉ. स्वाती चव्हाणला अटक

Nashik Todays News: पोलिसांनी नीलेशला अटक केल्यानंतर स्वाती चव्हाणला अटक केली.

पुढारी डिजिटल टीम

Manisha Jejurkar Case Dr. Swati Chavan Arrest

किरण ताजणे, नाशिक

नाशिक : नाशिकच्या आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी डॉ. स्वाती चव्हाणला अटक केली आहे. चव्हाण ही नाशिक जिल्हा रुग्णालयात मानसोपचार विभाग प्रमुख आहेत.

डॉ. मनीषा जेजूरकर (वय 40) यांनी 6 मार्चरोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मनीषा यांची बहीण रोहिणी थोरात यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पती डॉ. नीलेश जेजूरकरने केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे बहिणीने टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप त्यांनी केला होता.

शुक्रवारी नाशिक पोलिसांनी डॉ. नीलेशला अटक केली होती. अटक टाळण्यासाठी नीलेशने सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नाशिक पोलिसांनी नीलेशला बेड्या ठोकल्या.

मनीषा यांची बहीण रोहिणी थोरात यांनी फिर्यादीत डॉ. स्वाती चव्हाणचा उल्लेख केला होता. 2021 पासून नीलेश – मनीषा यांच्यातील संबंध बिघडले होते. डॉ. नीलेश त्याची मैत्रिण डॉ. स्वातीचे ऐकत होता. तिच्या सांगण्यावरुनच नीलेशने पत्नी मनीषाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

यानुसार पोलिसांनी नीलेशला अटक केल्यानंतर स्वाती चव्हाणला अटक केली. स्वाती चव्हाणच्या अटकेने तपासाची दिशा बदलली जाण्याची शक्यता असून आत्महत्या की हत्या, याचे गूढ उकलणार आहे. डॉ. स्वाती चव्हाण ही नाशिक जिल्हा रुग्णालयात मानसोपचार विभाग प्रमुख आहे. स्वाती- नीलेशमध्ये मोबाईलवर झालेला संवाद हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT