Malegaon Municipality मालेगाव महापालिका Pudhari News Network
नाशिक

Malegaon Municipal Corporation | चौथ्या दिवशी 200 अतिक्रमणांवर कारवाई; मनपाची मोहीम तीव्र

Malegaon Municipal Corporation | महानगरपालिकेच्या विशेष अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत चौथ्या दिवशी सुमारे 200 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेच्या विशेष अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत चौथ्या दिवशी सुमारे २०० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी (दि. ४) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली.

महापौर नसरीन शेख आणि आयुक्त रवींद्र जाधव यांच्या आदेशानुसार प्रभाग २ मधील आयेशानगर कब्रस्तान ते करीम नाका -द्याने शिवार परिसरातील सुमारे १०० ते १५० कच्च्या व पक्क्या स्वरूपातील अतिक्रमणे हटविण्यात आली.

तसेच प्रभाग ३ मधील वरळी रस्ता परिसरातील आणखी ५० ते ६० अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले साहित्य मनपाच्या गोदामात जमा करण्यात आले. उपायुक्त डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

यामध्ये सहायक आयुक्त धोंडगे, सहायक नगररचनाकार गणेश माळी, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक भरत सावकार, प्रभाग अधिकारी सचिन महाले, श्याम बुरकूल, मोहम्मद इरफान, संतोष गायकवाड तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी आणि विट मुकादम यांचा सहभाग होता. मोहीम सुरळीत पार पडावी यासाठी अपर पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT