चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. CCTV
नाशिक

Malegaon Crime News | मालेगावमध्ये चड्डी बनियन गॅंगची दहशत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मालेगाव शहरात चड्डी बनियन गँगमधील चोरट्यांनी गेल्या १५ दिवसांत चोरी, घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका सराईत चोरट्यास पकडले आहे. मात्र तो या गँगमधील सदस्य आहे का नाही याची चौकशी मालेगाव पोलिस करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मनमाड चौफुलीवरील खते विक्री, हार्डवेअर, विजेचा पंप, पाणी जार विक्री करणारी सहा दुकाने चोरट्यांनी फोडली. यात लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करताना सहायक अतिरीक्त पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या पथकाने संशयित विकास सदू भोई (रा. धुळे) यास पकडले. तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र तो चड्डी बनियन गँगचा सदस्य आहे की नाही याची चौकशी पोलिस करीत आहेत.

आतंरराज्यीय गुन्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने गेल्या १५ दिवसांत मालेगावमध्ये ४ वेळा गुन्हे केल्याचे समोर येत आहे. तसेच जळगाव जिल्हा, मध्यप्रदेशमधील खंडवा येथेही याचप्रकारे घरफोड्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही टोळी आंतरराज्यीय असल्याचा संशय आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT