Nashik Crime News | मित्रानेच केला मित्राचा घात; चौदा महिन्यानंतर खूनाची उकल

चौदा महिन्यानंतर खूनाची उकल; मद्यातून दिल्या ब्लडप्रेशर, झोपेच्या गोळ्या
सिडको, अश्विननगर पाथर्डी फाटा युनिट क्रमांक २ कार्यालय
सिडको : अश्विननगर पाथर्डी फाटा युनिट क्रमांक २ कार्यालयात संशयित आरोपी समवेत पोलिस अधिकारी.(छाया : राजेंद्र शेळके)
Published on
Updated on

सिडको : कोपरगाव भागात १४ महिन्यांपूर्वी झालेल्या युवकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने त्रिमूर्ती भागातून संशयिताला अटक केली आहे. त्याने चौकशीत मित्राला मद्यातून ब्लड प्रेशर व झोपेच्या गोळ्यांची अतिरिक्त मात्र देत खून केल्याची कबुली दिली आहे. संशयित प्रमोद जालींदर रणमाळे याचा शुक्रवारी रात्री कोपरगाव पोलिसांकडे ताबा देण्यात आला.

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती, अभिजीत राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर) याचा २८ जून २०२३ रोजी कोपरगाव पोलिस ठाणे हद्दीत संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यादृष्टीने तपास सुरू असताना युनिट दोनचे हवालदार मनाहेर शिंदे यांना काही धागेदोरे सापडले. त्यानुसार सिडको भागात चार दिवस सापळा रचून संशयित प्रमोद रणमाळे यास शिताफीने ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अपघाती मृत्यूचे पेपर अवलोकन, तांत्रिक विश्लेषण वापरून संशयिताची चौकशी केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

असा केला घात

मयत अभिजीत सांबरे व संशयित रणमाळे हे मित्र होते. त्यांच्या पैशांच्या व्यवहारातून वाद विकोपास गेला होता. त्यातून रणमाळे याने सांबरेचा काटा काढण्याचा डाव आखला. २७ जून २०२३ रोजी आर्थिक व्यवहाराकरीता सांबरे हा येवला जाणार होता. त्याने रणमाळे यासदेखील तेथे बोलावले होते. सांबरे यास मद्याचे व्यसन असल्याची संधी साधत रणमाळेने त्यास रात्री ९ वाजता मद्यातून ब्लड प्रेशर व झोपेच्या गोळ्या मिसळून पाजले. त्यानंतर बुलेटवर बसवून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने घेऊन गेला. वैजापुर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने जाताना सांबरेची शुध्द हरपल्याची खात्री करत त्याला रस्त्याच्या कडेला फेकून देत पोबारा केल्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news