घरफोडीच्या गुन्ह्यातील एका अट्टल गुन्हेगारास अटक Pudhari File Photo
नाशिक

Malegaon Crime News | अनैतिक संबंधातून खून; आरोपीला जन्मठेप

Malegaon Crime News | बहिणीच्या प्रियकराचा खून केल्याप्रकरणातील मुख्य संशयितास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

बहिणीच्या प्रियकराचा खून केल्याप्रकरणातील मुख्य संशयितास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील इतर दोन संशयितांना पुराव्याअभावी निर्दोषमुक्त करण्यात आले आहे.

जात ३० जून २०२० रोजी सायंकाळी साकोरा येथील वानरदेव चौफुलीजवळ हा प्रकार घडला होता. फिर्यादी माया विजय शिंदे, त्यांचे पती विजय शंकर शिंदे व सासू हिराबाई शिंदे हे दुचाकीवरून नांदगावकडे असताना आरोपींनी त्यांना अडवले.

बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवून तिला सोडून दिल्याच्या रागातून आरोपी बंडू निवृत्ती हिलम याने विजय शिंदे यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला होता. यावेळी फिर्यादी माया शिंदे यांनाही चाकूने जखमी करण्यात आले होते.

या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सहायक पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी तपास करून मालेगाव येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. अशोक एन. पगारे यांनी ११ साक्षीदार तपासून प्रभावी युक्तिवाद केला.

२७ फेब्रुवारी २०२६ रोजी अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेटा यांनी या प्रकरणी निकाल जाहीर करत आरोपी बंडू निवृत्ती हिलम यास दोषी धरून जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर खंडू ऊर्फ निवृत्ती महादू हिलम व पंगाबाई निवृत्ती हिलम यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT