नाशिक

Nashik MLC election -नाशिक शिंदे शिवसेनेला; नरेंद्र दराडेंचे नाव निश्चित

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महायुतीत विधान परिषदेच्या जागावाटपाचे त्रांगडं अखेर सुटले असून, बहुचर्चित नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही शिंदे शिवसेनेला सुटली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे नाव निश्चित झाले आहे. दरम्यान अखेरपर्यंत कुणाल दराडे, अंजूम कांदे, विजय करंजकर, हेमंत गोडसे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस होती. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांना अर्ज दाखल करण्याचे आदेश रविवारी (दि.३१) उशिराने प्राप्त झाले असल्याने महायुतीच्या वतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी १०.३० वा. उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

शिवसेनेला जागा सुटली असली तरी भाजपने आपला दावा कायम ठेवला आहे. भाजपतील इच्छुक जागा लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे भाजप काय भूमिका घेते याकडे आता लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या १७जागांपैकी किमान सात जागा या आपल्याला मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते.

शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी त्यासाठी चांगलाच जोरही लावला होता. भाजपकडून माजी सभापती गणेश गिते, नीलेश बोरा यांसह अर्धा डझन इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गणेश गिते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्जदेखील सादर केला. भाजप जागेसाठी ठाम शिवसेनेला जागा सुटल्याचे निश्चित झालेले असले तरी, भाजप मात्र जागेसाठी ठाम आहे. जागा वाटपाची घोषणा झाली नसल्याचे इच्छुकांकडून सांगण्यात येत आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

शिवसेनेला जागा मिळाल्यानंतर दराडे, करंजकर, कांदे यांच्यात चुरस होती. असे असले तरी दराडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असून, मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT