Electricity theft pudhari photo
नाशिक

Nashik Electricity News | महावितरणच्या भरारी पथकाची धडक कारवाई; वडाळ्यात तब्बल एक कोटीची वीजचोरी उघड

Nashik Electricity News | महावितरणच्या भरारी पथकाने वडाळा येथील मदिनानगर येथे प्लास्टिक दाणेनिर्मिती व बर्फनिर्मिती कारखान्यातील वीजचोरी पकडली.

पुढारी वृत्तसेवा


देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या भरारी पथकाने वडाळा येथील मदिनानगर येथे प्लास्टिक दाणेनिर्मिती व बर्फनिर्मिती कारखान्यातील वीजचोरी पकडली. गेल्या वर्षभरापासून अप्रामाणिकपणे व स्वतःच्या फायद्यासाठी सुमारे एक कोटीची वीजचोरी संबंधितांनी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

महावितरण भरारी पथकाचे अधिकारी अनिकेतकुमार नारायण तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडाळा येथील मदिनानगर, सल्ली पॉईंट येथे प्लॉस्टिक दाणेनिर्मितीच्या कारखान्यासाठी १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या वर्षभरात तीन लाख ३२ हजार ६३६ वीज युनिटची (रक्कम रुपये ७० लाख १३ हजार २४०) चोरी केली.

तसेच त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या बर्फनिर्मितीच्या कारखान्यासाठी एक लाख २८ हजार ३३१ युनिट (रक्कम २७ लाख ५ हजार ९६० रुपये) वीजचोरी केल्याचे आढळले. महावितरणने वीजचोरी पकडल्यानंतर संबंधितांना दंडासह वीजबिल देऊनही त्यांनी वीजबिल भरणा केला नाही.

महावितरणच्या भरारी पथकाने दोन्ही कारखान्यांवर छापा टाकला असता त्या ठिकाणी कामगार राहील हमीद शेख मिळून आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जागा मालक कौसर परवीन मकसदू खान, कारखाना चालक मोहम्मद फारूक खान व कामगार राहील हमीद शेखवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

जेलरोडला मंगळसूत्र ओढून नेले:

जेलरोड - जुना सायखेडा रोडवरील एका इंग्रजी शाळेजवळ भाजीपाला खरेदी करून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे चाळीस हजारांचे सोनेचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या चोरट्याने ओढून नेले. जेलरोड, गोसावीनगर येथील शिवछाया सोसायटीत राहणाऱ्या नलिनी भालेराव या गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास होली फ्लॉवर शाळेजवळून भाजीपाला खरेदी करून रस्त्याने पायी जात होत्या. गोसावीनगर येथे समोरून राखीव रंगाच्या मोपेड दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे चाळीस हजारांचे मंगळसूत्र ओढून नेले. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT