महावितरण  Pudhari
नाशिक

Mahavitaran Power Theft Crackdown |राज्यभरात तीन दिवसांत २५० वीजचोऱ्या उघड

महावितरणचा वीजचोरांना दणका, ६.२७ कोटींचा गैरव्यवहार उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वीजचोरी आणि अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरणने राज्यभरात धडक मोहीम हाती घेतली आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने अवघ्या तीन दिवसांत केलेल्या कारवाईत वीजचोरीची २५० प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या प्रकरणांत सहा कोटी २७ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधित ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात आली असून, निर्धारित मुदतीत रक्कम न भरल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

वीजचोरीमुळे होणारी महसूल गळती रोखण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांमार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रादेशिक परिक्षेत्रांत एकाच वेळी तपासणी करण्यात आली.

यात कोकण विभागात ५३, पुणे विभागात ७३, छत्रपती संभाजीनगर अनधिकृत वापर करणाऱ्यांवर बडगा वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीजजोडण्यांचीही महावितरणकडून तपासणी सुरू आहे. अनधिकृतपणे वीजपुरवठा सुरू करून वीज वापरणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी केले आहे.

विभागात ५६, तर नागपूर विभागात ६८ वीजचोरीची प्रकरणे आढळली. या सर्व प्रकरणांचे मूल्यांकन करून संबंधितांना सहा कोटी २७ लाख रुपयांची देयके बजावण्यात आली आहेत. या कारवाईत विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये २४० ग्राहकांविरुद्ध वीजचोरीची कारवाई करण्यात आली.

कलम १२६ अंतर्गत अनधिकृत वीजवापराच्या दोन प्रकरणांत कारवाई करण्यात आली. वीजचोरीचे देयक आणि दंडाची रक्कम विहित मुदतीत न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह तीन वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT