Marriage  Pudhari
नाशिक

Summer Wedding | चाळिशी पार तापमानातही लग्रांचा धूमधडाका

वऱ्हाडींची होतेय दमछाक; आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शाळेला सुट्या लागताच सर्वत्र लठासराईचा हंगाम जोरात सुरु झाला आहे. एकाच दिवशी दोन ते तीन विवाहसमारंभ असल्याने बन्हाडीची ऐन उन्हाळ्यात चांगलीच दमछाक होत आहे. वातावरणातील सहत होणारे बदल आणि दिवसेंदिवस वाढती उष्णता यामुळे बन्हाडींसह नागरिकांनादेखील उन्हाच्या झळांचा फटका सहन करावा लागत आहे. त्यात मुहूर्त वेळेवर ला लावणे कठीण होत असून, विवाहसमारंभाच्या ठिकाणी ऐनवेळी धावपळ वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरवर्षीप्रमाणे एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत विवाहसमारंभमोठ्या प्रमाणात पार पाडले जातात. विशेष महणजे ४० पार तापमानातही वन्हाडींचा उत्साह नाचगाण्यातून ओथंबूर चाहात असतो. उन्हाळ्यात शेतकरी वर्ग निवांत असल्याने आणि शाळा कॉलेजेसना सुटधा लागून पाहुण्यांची सोय करणे सोपे होत असल्यामुळे काळातच लहासराईची परंपरा दिसून येते. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे विवाहसमारंभावर परिणाम होत असून फड़क दिवसभर उन्हाच्या लाहीलाहीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

लग्नसराईत अशी घ्या काळजी...

विवाहसमारंभात डीजेचा दणदणाट आणि शक्यतो दुपारची बरात टाळायला हवी, उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे त्वचारोगांचाही प्रादुर्भाव वाढत आहे. उन्हाचा वादता पारा लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा वेळी सनस्क्रीन लावावे, सनकोटवा चापर कराचा, बाहेर पडताना डोक्यावर रुमाल किया टोपी वापराची, दिवसभर शक्य तेवढे भरपूर पाणी प्याये, ताप, सर्दी किया डोकेदुखीची लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळे कोरडे पडणे आणि अॅलर्जीचा धोका निर्माण होत असतो. सनगॉगल्सचा वापर आवर्जून करावा. बाहेरून आल्यावर डोळे मेड पाण्याने धुवावेत तसेच तोंडावरही पाण्याचा शिडकाचा कराचा लग्नतिथींमुळे

लग्नतिथींमुळे मोगरा ५०० रुपये किलो...

मे महिन्यात विवाहाच्या तारखा अधिक असल्याने एकूणच सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत मोठी बाद झालेली आहे. विवाह म्हटला की, महिलांना गजन्यासाठी पसंती असते. मात्र एक किलो मोगऱ्याचा दर ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर झेंडू, गुलाब शेवंती, अबोली, काटेकोरांटीची जांभळी, केशरी आदी फुलांच्या दरांतारी दुप्पट वाढ झालेली आहे. सोमवारी (दि. २०) गोदाघाटावरील फूल बाजारात झेंडूच्या क्रेटसाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत होते. लांब व आखूड दांडीच्या गुलाबाच्या दरांतही वेगवेगळी दरवाढ आहे. शेवंती १५० ते २०० रुपये किलो, जस्टर २०० रुपये किलो, लीली बंडल १५ रुपये आहे. तर किलोभर मोगाण्याचा दर ५०० रुपयांपर्यंत गेल्याने तयार मोगऱ्याच्या गळ्याच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे, तर मोगऱ्याची सुटी फुलेदेखील भाव खात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT