नाशिक

Lok Sabha Election 2024 | देवळा येथे मतदार जनजागृती’साठी मोटार सायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम

गणेश सोनवणे

देवळा ; लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचार संहिता सुरू झाली आहे. त्यातअंतर्गत स्वीप उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य नोडल अधिकारी – स्वीप आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागासाठी तालुका निहाय नोडल अधिकारी स्वीप म्हणून जिल्हा व तालुका अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

त्यानुसार १ मे महाराष्ट्र दिना निमित्ताने देवळा शहरातून तहसीलदार डॉ .मिलिंद कुलकर्णी , मुख्याधिकरी प्रमोद ढोरजकर , गटविकास अधिकारी भरत वेंदे ,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव ,सपोनि दिपक पाटील यांचे मार्गदर्शना खाली सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी देवळा तहसील कार्यालयापासून शिव स्मारक पर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी मतदान जनजागृती बाबत घोषणा देण्यात आल्या. तसेच नगर पंचायत कार्यालय जवळ मतदान करण्यासाठी सामूहिक शपथ घेऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी भरत वेंदे यांची स्वीप नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, राजेंद्र चव्हाण, शामकांत पाटील, नानासाहेब पवार, ,डॉ. संतोष पजई, राजेश विसावे , सुनील देवरे आदी विभाग प्रमुखांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी देवळा शहरातून मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. मतदान करावे जास्तीत जास्त मतदान होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी हा यातील प्रमुख उद्देश आहे. त्यानुसार देवळा शहरातील बसस्थानक परिसरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी कर्मचारी यांनी मतदार जनजागृतीच्या घोषणा देत "मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो " , वोट द्यायला जायचे आहे – आपले कर्तव्य बजवायचे आहे, मत द्या आपला आवाज ऐकू द्या, तसेच हातात जनजागृतीचे फलक घेऊन शहरातून जनजागृती करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे तुषार थोरात ,राजेंद्र जगताप, समीर बच्छाव, ललित जाधव, रविंद्र पवार, योगेश पगार , संभाजी देवरे, रुपेश आहेर, अनिल आहेर यांच्या सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होऊन सहभागी झाले होते.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT