लासलगाव बस आगाराला ग्रामीण भागाचे वावडे आहे का ? pudhari photo
नाशिक

Lasalgaon News | लासलगाव बस आगाराला ग्रामीण भागाचे वावडे आहे का ?

संतप्त प्रवाश्यांकडून सवाल

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव वृत्तसेवा - लासलगाव बस आगाराच्या ढिसाळ नियोजनाचा फटका हा ग्रामीण भागातील प्रवाश्यांना बसत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेली एसटी आता प्रवाशांना नकोशी झाल्याने एसटी महामंडळाला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दररोज लांब पल्याच्या गाड्या रस्त्यावर चालवल्या जात आहे. फक्त उत्पन्न वाढीकरिता देखभाल आणि दुरुस्ती याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. सुरक्षित प्रवास म्हणून नागरिक बससेवेला प्राधान्य देतात मात्र खटाडा बस रस्त्यावर चालवून प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. लासलगाव डेपोतून दररोज नाशिक मार्गे जादा संभाजीनगर आणि धुळे येथे प्रत्येकी पाच बस पाठवून स्थानिक प्रवाशी वर्गाची गैरसोय केली जाते. त्यामुळे लासलगाव आगाराला ग्रामीण भागाचे वावडे आहे का ? असा संतप्त सवाल प्रवाश्यांकडून विचारला जात आहे.

लासलगाव व परिसरातून पुणे येथे शिक्षणासाठी व नोकरीनिमित्त विध्यार्थी व प्रवाशी नेहमी लासलगाव-कोळपेवाडी-पुणे मार्गे मंजूर असलेली ६.३० ची फेरी सुरू करावी.

लासलगाव ते सिन्नर आणि सिन्नर ते लासलगाव येथे जादा फेऱ्याचा अट्टाहास का ?

कोणाच्या सोयीकरिता सदर फेरी चालविली जात आहे ?

कोरोना काळापूर्वी लासलगाव चांदोरी नासिक मार्गावर दर ३० मिनिटांनी फेरी होती परंतु आता सकाळी ०९.०० वाजेनंतर एक ते दीड तास फेरी नसते. त्यामुळे प्रवाशी वर्ग विंचुर येथे येऊन अन्य डेपोच्या बसने प्रवास करतात.

मनमाड येथे जंक्शन रेल्वेस्टेशन आहे परंतु सदर मार्गावर कमी फेऱ्या आहेत सदर मार्गावर किमान एक तासाच्या अंतराने फेऱ्या सुरू कराव्यात..

लासलगाव विंचुर निफाड परीसरातून दुपारी पुणे जाणेसाठी एकही फेरी नाही प्रवाशी वर्ग नासिक मार्गे पुणे जातात तरी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान लासलगाव निफाड पुणे नवीन फेरी सुरू करावी.

विंचुर येथून लासलगाव रेल्वे स्टेशन करिता सकाळी पंचवटी एक्सप्रेस, कुर्ला एक्सप्रेस रात्री पंचवटी एक्सप्रेस करिता बंद असलेली फेरी सुरू करावी.

लासलगाव डेपोच्या अखत्यारीत असलेल्या बस स्टँडवर विद्यार्थी पास वाटपाची वेळ सकाळी ८.०० ते १७.०० असते, परंतु सदर बस स्टँडवर असलेले कट्रोलर दुपारी १५.३० वाजेनंतर पास देत नाही किवा देण्याचे टाळाटाळ करतात तरी याबाबत १६.३० वाजेपर्यंत पास देण्याबाबत कार्यवाही व्हावी. लासलगाव डेपोच्या अखत्यारीत असलेल्या बस स्टँडवर प्रवाशी वर्गाकरिता पिण्याचे पाणी सोय नाही. अश्या अनेक समस्यांनी लासलगाव आगराला ग्रासले आहे.

लासलगाव डेपो प्रमुख यांना लांब पल्ल्याच्या फेऱ्या चालविणेबाबत स्वारस्य असल्याचे दिसून येत आहे,. आशिया खंडात कांद्यांची बाजारपेठ म्हणून नावलौकीक असलेली बाजारपेठ लासलगांव आहे. देशाच्या विविध भागातुन व्यापारी व संबधित असणारे यांची वर्षभर ये-जा चालुच असते. परंतु एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विनाकारण प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या लासलगाव बस आगारात जुन्याच गाड्यांवर बसेस फेऱ्या मारत आहे. त्यांची अवस्था फार वाईट आहे. लासलगाव-नाशिक साठी फेऱ्या कमी आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हर्षल
कोचर, प्रवाशी लासलगाव
लासलगाव डेपोतून दररोज जादा संभाजीनगर आणि धुळे येथे बस पाठवून स्थानिक प्रवाशी वर्गाची गैरसोय केली जाते. लासलगाव डेपोच्या अखत्यारीत असलेल्या बस स्टँडवर प्रवाशी वर्गाकरिता पिण्याचे पाणी सोय नाही.
प्रवीण भावसार, लासलगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT