नाशिक

Khandoji Maharaj Yatrotsav : पिंपळनेरला कुस्तीचा आखाडा गाजला

गणेश सोनवणे

पिंपळनेर, ता. साक्री : पुढारी वृत्तसेवा

येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे श्री खंडोजी महाराजांच्या 195व्या पुण्यतिथीनिमित्त नामसप्ताह महोत्सवाची सांगता कुस्तीच्या दंगलीने झाली. रोमहर्षक रंगतदार व प्रेक्षणीय ठरलेली 25 हजाराच्या अंतिम कुस्तीत तीन वेळा उत्तर महाराष्ट्र केसरी विजेते बालू बोडके यांनी नांदेड केसरी राजू कदम यांना अवघ्या काही सेकंदातच चित करून ही मानाची कुस्ती जिंकली. राजू कदम हे उपविजेता ठरले.

संबधित बातम्या:

बाळू बोडके ठरले मानकरी

चिकसे येथील कै.शंकरराव भगाजी माळी फाउंडेशन तर्फे ताब्याची कळशी 25 हजार रुपये रोख नाशिक येथील गव्हर्णमेंट कॉन्ट्रॅक्टर विलासराव जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. तर, उपविजेता ठरलेल्या पै.राजू कदम यांना चिकसे येथील उपसरपंच संजय जगताप यांच्या हस्ते 5 हजार रुपये रोख देण्यात आले.

मराठवाडासह देशभरातील नामवंत मल्लांनी दिली हजेरी

यावेळी मैदानावर मराठवाडासह गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथील नामवंत मल्लांनी डावपेच खेळले व आपले कौशल्य दाखवून कुस्त्या जिंकल्या. त्यांना रोख रक्कमेचे बक्षिस, भांडी इत्यादी बक्षीस स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली.

हजारोंच्या संख्येने नागरिकांनी पाहिली कुस्ती

कुस्त्यांची दंगल बघण्यासाठी कुस्ती मैदानावर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. पंच म्हणून राजेंद्र गांगुर्डे, संभाजी ढोले यांनी काम पाहिले.

कुस्ती दंगलीचे उद्घाटन योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या हस्ते

कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी खा. बापूसाहेब चौरे, जि.प.सदस्य हर्षवर्धन दहिते, नाशिक येथील गव्हर्णमेंट कॉन्ट्रॅक्टर विलासराव जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, पं.स.सदस्य देवेंद्र गांगुर्डे, सरपंच देविदास सोनवणे, युवानेते प्रवीण चौरे, माजी.उपसरपंच संजय जगताप, काँग्रेसचे अशोक सोनवणे, माजी उपसभापती नरेंद्र मराठे, सपोनी.श्रीकृष्ण पारधी, कुस्ती समितीचे पी.एस.पाटील, सतीश पाटील, सुदाम पगारे, प्रताप पाटील, योगेश नेरकर, जे.टी. नगरकर, प्रकाश एखंडे, दीपक खरोटे, भैय्या बाविस्कर, सुनील लोखंडे, संजय ढोले, माजी सभापती संजय ठाकरे, विनोद कोठावदे, वसंत चौधरी, मोतीलाल पोतदार, कोठावदे, विजय नंदन, ग्रां.पं.सदस्य योगेश बधान, देवेंद्र कोठावदे, निलेश कोठावदे, उल्हास बागुल यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

सपोनी.श्रीकृष्ण पारधी यांच्यासह पोलीस सहकारी व राज्य राखीव दलाने चोख बंदोबस्त ठेवला. सुत्रसंचलन प्रा.किरण कोठावदे, नितीन नगरकर यांनी केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT