समोरासमोर झालेल्या जोराच्या धडकेत दोन्ही वाहनांच्या पुढील भागांचा झालेला चक्काचूर Pudhari
नाशिक

Nashik Accident | कसबे वणी–नाशिक रस्त्यावर कारचा भीषण अपघात; १ ठार, ६ जखमी

ओझरखेड धरणाच्या सांडव्याजवळ थार आणि कारची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांच्या पुढील भागांचा चक्काचूर

पुढारी वृत्तसेवा

Kasbe Vani Nashik Road Car Accident

कसबे वणी : कसबे वणी–नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्याच्या पुढे हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी (दि. १७ ) रात्री साडेदहाच्या सुमारास थार आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात कार चालक सुनिल अरुण शिंदे यांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

थार (क्र. एमएच १५ जेएच ८८८२) नाशिकच्या दिशेने, तर कार (क्र. एमएच १५ केयू १२०५) वणीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

या अपघातात अजय पाटील, दिनेश पाटील, काजल पाटील, भावेश पाटील, शिवसागर शिंदे आणि यश पाटील हे सहा जण जखमी झाले आहेत. हे सर्व वरखेडा येथील रहिवासी असून इर्टिगा गाडीतून प्रवास करत होते. थार गाडीतील प्रवाशांची संख्या आणि जखमींना पुढील उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात हलविण्यात आले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT