प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आकर्षक आभूषणं चढवण्यात आली आहेत.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Kalaram Mandir Nashik | 'श्री राम जय राम जय जय राम' ; रामरायाचा जन्म झाला

Ram Navami 2025 | राम जन्मोत्सव सोहळा ; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा काळाराम मंदिरात उत्साहात वाजतगाजत पार पडला आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढवण्यात आली आहेत. भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिरात काटेकोर व्यवस्थापन करण्यात आले आहे.

नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात रविवार (दि.6) आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. काकड आरती नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आले आहे. तर दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

प्रभू सीयावर रामचंद्र की जय नाशिक : चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. यानिमित्त प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईमुळे उजळून निघाला आहे.

चैत्र शुद्ध नवमीला रामजन्म

चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या 'प्रभू रामचंद्राचा' जन्म झाला. या दिवसाला 'रामनवमी' असे म्हणतात. ज्याप्रमाणे श्री कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला.

रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायला जातो. या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते. आज सगळीकडे रामनवमीचा उत्सव पाहायला मिळत आहे.

नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा होत आहे. पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या गर्दीचा अंदाज बघता काटेकाेरपणे व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT